माजी पॉर्न स्टार मिया खलिफा सध्या चर्चेत आहे. भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे तिला सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केलं, त्यानंतर आता तिचा एक फोटो व्हायरल होत असून त्या फोटोवरुन वातावरण चांगलंच तापलंय.

व्हायरल होणाऱ्या फोटोद्वारे काँग्रेसचे कार्यकर्ते मिया खलिफाच्या पोस्टरला केक भरवत असल्याचा दावा सोशल मीडियामध्ये केला जात आहे. भाजपाचे सदस्य मेजर सुरेंद्र पुनिया यांच्या व्हेरिफाइड ट्विटर अकाउंटवरुनही हा फोटो ट्विट करण्यात आला आहे. पण, हा फोटो खरा नसून एडिटेड असल्याचं पडताळणीत समोर आलं आहे. गुगलवर रिव्हर्स फोटो सर्च केल्यानंतर या फोटोमागचं सत्य समोर येतं. रिव्हर्स सर्च केल्यानंतर स्टॉक इमेज साइट ‘गेट्टी इमेजेस’वर हा फोटो भेटतो. यानुसार, मूळ फोटो २००७ मधील आहे. भारतीय युवा काँग्रेसचे समर्थक आपल्या पक्षाचे नेता राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा करत असतानाचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या पोस्टरसमोर केक घेऊन उभे असल्याचं स्पष्ट दिसतंय. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये राहुल गांधींच्या जागी मिया खलिफाचा फोटो एडिट करुन लावण्यात आला आहे.

Farmer Protest : ‘समोसा-गुलाबजाम’ खात मिया खलिफाने पुन्हा दिला शेतकऱ्यांना पाठिंबा, शेअर केला Video

व्हायरल होणारा फोटो मिया खलिफाचा नसून राहुल गांधींचा असल्याचं स्पष्ट झालं आहे.