News Flash

आईनं पोटच्या मुलीचं लग्न स्वत:च्या प्रियकराशी लावलं आणि मग…

हैदराबादमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १७ वर्षीय आईविरोधातच पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आपल्या बहिणाला आत्महत्या करण्यास आईनेच भाग पाडलं असल्याचा या मुलीने आरोप केला आहे.

पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत मुलीने म्हटले आहे की, साधारण वर्षभरापासून आई आमच्या वडिलांपासून विभक्त राहत होती. या दरम्यान आईचे नवीन कुमार नाव असलेल्या व्यक्तीबरोबर संबंध प्रस्थापित झाले होते. या व्यक्तीचे आमच्या घरी कायम येणेजाणे होते.

नवीन कुमारबरोबरचे आपले संबंध आणखी वाढवण्यासाठी आईने नवीन कुमारबरोबर माझ्या मोठ्या माझ्या बहिणीचे लग्न लावून दिलं. मात्र काही दिवसानंतर हा प्रकार माझ्या मोठ्या बहिणीला असह्य झाला व शेवटी या सर्वाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

तक्रारदार मुलीने सांगितले की, तिची बहिण एका महाविद्यालयात शिकत होती. तिला जेव्हा पती व आई यांच्यातील संबंधाबाबत समजले, तेव्हा तिने घर सोडण्याची धमकी देखील दिली होती. शिवाय, तिच्या लग्नानंतर देखील तिच्या पती व आईचे संबंध पूर्वीप्रमाणेच होते. यामुळे ती खूप तणावात होती. तिने हा प्रकार जर बंद झाला नाहीतर मी आत्महत्या करेन अशी धमकी देखील त्या दोघांना दिली होती. मात्र, तरीदेखील परिस्थिती जैले थै राहिल्याने तिने कंटाळून आत्महत्या केली.
हैदराबादमधील मीरापेट पोलीस ठाण्यात मृत महिलेच्या बहिणीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या महिलेच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 3:50 pm

Web Title: mother married her boyfriend with daughter and after that msr 87
Next Stories
1 ‘गब्बर’च्या मुलीचं धाडसं पाऊल, तुम्हालाही वाटेल अभिमान
2 करोनाशी लढण्यासाठी फेसबुकनं जाहिर केली मदत; देणार इतके कोटी डॉलर्स
3 …तो माँ कहती है; करोनाच्या जनजागृतीसाठी रेल्वेची हटके आयडिया
Just Now!
X