20 September 2020

News Flash

Viral Video : मेलेलं पिल्लू कवटाळून ती आई कित्येक दिवस रडत होती

पिल्लाचा जीव गेला पण आईनं आशा नाही सोडली

ही आई आपल्या पिल्लाला घेऊन कित्येक दिवस तिथेच बसून होती.

प्राणी मूक असले म्हणून काय झाले, त्यांनाही भावना असतातच ना! त्यांनाही वेदना होतात, त्यांनाही दु:ख होतेच. आपल्या जवळचं कोणी गेलं की त्यांनाही दु:ख होतचं. असाच एक हृद्यद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं. काही महिन्यांपूर्वी जन्मलेल्या माकडाच्या पिल्लाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या पिल्लाची आई काही दूर अंतरावर बसली होती. विजेच्या धक्काने पिल्लू खाली कोसळल्यानं आईनं पिल्लाकडे धाव घेतली. आपलं पिल्लू यापुढे कधीच उठणार नाही हे तिलाही माहिती होतं पण आईचं हृद्य मात्र काही केल्या मानायला तयार नव्हतं.  इथल्या स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही आई आपल्या पिल्लाला घेऊन कित्येक दिवस तिथेच बसून होती. अनेकदा या आईनं आपल्या पिल्लाला कवटाळून जागं करण्याचा प्रयत्न केला. कदाचित आपली माया मिळाली तर पिल्लू उठेन अशी भाबडी आशा या आईला होती पण ती व्यर्थ ठरली. हा हृद्यद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2017 1:00 am

Web Title: mother monkey carries her lifeless infants body around with her for many days
Next Stories
1 मराठमोळ्या ‘सोनू’च्या गाण्याचं पाकिस्तानी व्हर्जन ऐकलंत का ?
2 Viral Video : सावत्र असली तरी आई ही आईच असते!
3 Viral Video : हे पाहा; शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काय करायला लावले
Just Now!
X