22 January 2021

News Flash

प्रेयसीने विवाहित प्रियकराला मिळवण्यासाठी मोजले तब्बल दीड कोटी रुपये, का लावली प्रेमाची किंमत?

बॉलिवूडचा गाजलेला सिनेमा 'जुदाई'ची आठवण देणारी खरीखुरी प्रेमकहाणी...

(प्रतिकात्मक छायाचित्र)

प्रेम अनमोल असतं आणि प्रेमाची काही किंमत नसते असं म्हटलं जातं. पण, मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये हे सर्व खोटं ठरलंय. खरंतर ‘पती, पत्नी आणि वो’ची ही प्रेमकहाणी बॉलिवूडचा गाजलेला सिनेमा ‘जुदाई’ची आठवण देणारी आहे.

भोपाळमध्ये एका महिलेने आपल्या विवाहित प्रियकराला मिळवण्यासाठी त्याच्या पत्नीला जवळपास दीड कोटी रुपये दिलेत. भोपाळच्या कुटुंब न्यायालयात हा तोडगा काढण्यात आला. ५४ वर्षांच्या एका महिलेच्या पतीचं निधन झालं, त्यानंतर ती तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या इसमाच्या प्रेमात पडली.  त्याचं आधीच लग्न झालं असून पत्नी व दोन अल्पवयीन मुली आहेत. दोघंही एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. काही काळानंतर दोघांच्या नात्याबद्दल त्याच्या पत्नीला आणि मुलींना समजलं. त्यामुळे घरात वाद होण्यास सुरूवात झाली. आई -वडिलांमध्ये दररोज कडाक्याचं भांडण होत असल्याने अखेर त्या इसमाच्या मुलींनी कुटुंब न्यायालयात तक्रार केली. तक्रारीनंतर कुटुंब न्यायालयाने पती-पत्नीला समुपदेशनासाठी बोलावलं. त्यावेळी पतीने दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडल्याचं मान्य केलं, तसंच पत्नीसोबत राहण्यास नकार दिला. दोन वेळेस समुपदेशन केल्यानंतरही पती पत्नीसोबत राहण्यास तयार नव्हता. अखेर पत्नीने आपल्या पतीला सोडायची अर्थात घटस्फोटाची तयारी दाखवली. पण यासाठी तिने पतीच्या प्रेयसीसमोर एक अट ठेवली. आपल्या अल्पवयीन मुलींच्या भविष्यासाठी पतीच्या प्रेयसीने तिचं ड्युप्लेक्स घर आणि २७ लाख रुपये द्यावे अशी मागणी तिने केली.

अखेर प्रियकराला मिळवण्यासाठी त्या महिलेने प्रियकराच्या पत्नीला १५०० स्क्वेअर फूटचं ड्युप्लेक्स घर आणि २७ लाख रुपये रोख दिले. म्हणजेच आपलं प्रेम मिळवण्यासाठी तिने तब्बल दीड कोटी रुपये मोजले. लग्नाच्या इतक्या वर्षांनी फसवणूक केल्यामुळे पत्नीलाही त्याच्यासोबत राहायचं नव्हतं, पण दोन अल्पवयीन मुली असल्याने त्यांच्या भविष्यासाठी तिने हा निर्णय घेतला. या अनोख्या तोडग्यानंतर अखेर पती-पत्नीचं १८ वर्षांचं नातं तुटलं आणि पती प्रेयसीसोबत निघून गेला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2021 11:35 am

Web Title: mp woman allows her husband to marry his lover in exchange of rs 1 5 crore sas 89
Next Stories
1 सर्वात वेगवान पक्ष्यासोबत दुबईच्या राजपुत्राने लावली ‘रेस’, कोण जिंकलं? बघा व्हिडिओ
2 आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांनी वाचवला महाराष्ट्रातील तरुणाचा जीव, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
3 पाकिस्तान : वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘या’ व्यक्तीला झाली अटक; कारण वाचून गोंधळून जाल
Just Now!
X