01 October 2020

News Flash

सचिन, विराट, रोहित आणि युवीच्या विक्रमामागे धोनी ‘कनेक्शन’

माजी कर्णधार एम.एस धोनीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे

माजी कर्णधार एम.एस धोनीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. त्याप्रमाणे धोनी अनेक मोठ्या विक्रमांचा साक्षीदार देखील राहीला आहे. युवराज सिंहने एका षटकात लगावलेले सहा षटकार, सचिन तेंडुलकर-रोहित शर्माचे द्विशतक आणि विराट कोहलीच्या सर्वात जलद दहा हजार धावा यांच्या विक्रमी कामगिरीमध्ये एम.एस. धोनीचा सहभाग आहे. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण ज्यावेळी या चौघांनीही ज्यावेळी विक्रमी कामगिरी केली त्यावेळी दुसऱ्या टोकाला (नॉनस्ट्राइक एंड) धोनी फलंदाजी करत होता. ज्यावेळी दिग्गजांनी विक्रमी कामगिरी केली त्यावेळी आनंदात सहभागी होत सर्वातआधी शुभेच्छा दिल्या.

विराट कोहलीच्या दहा हजार धावा –
भारतीय कर्णधार विराट कोहलीने बुधवारी सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांमध्ये दहा हजार धावांचा पल्ला गाठला. कोहलीने सचिनचा १७ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. सचिन तेंडुलकरने २५९ डावांत फलंदाजी करताना दहा हजार धावा केल्या होत्या. मात्र, विराट कोहलीने हा कारनामा २०५ डावांत केला. विराट कोहलीने ज्यावेळी दहा हजार धावा केल्या त्यावेळी दुसऱ्या टोकाला धोनी फलंदाजी करत होता.

युवराजचे सहा षटकार –
१९ सप्टेंबर २००७ रोजी युवराज सिंहने स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सलग सहा षटकार लगावले. यावेळी युवराज सिंहने सर्वात जलद अर्धशतक झळकावले. आतंरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सलग सहा षटकार लगावण्याची ही पहिलीच वेळ होती. आणि यावेळी दुसऱ्या टोकाला धोनी फलंदाजी करत होता.

सचिनचे द्विशतक –
आतंरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिले एकदिवसीय द्विशतक लगावण्याचा कारनामा सचिन तेंडुलकरने केला होता. ग्वालियर येथे ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या एकदिवसीय सामन्यात सचिनने १४७ चेंडूत २०० धावा करण्याचा पराक्रम केला होता. सचिन तेंडूलकरने द्विशतक झळकावले त्यावेळी धोनीने सर्वात आधी शुभेच्छा दिल्या. कारण धोनी दुसऱ्या टोकाला फलंदाजी करत होता. या सामन्यात सचिन तेंडुलकरने २५ चौकार आणि तीन षटकार लगावले होते.

रोहित शर्माचे पहिले द्विशतक –
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाबरोबर आपले पहिले एकदिवसीय द्विशतक झळकावले. रोहित शर्माने १९ गगनचुंबी षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने १५८ चेंडूत २०९ धावांची खेळी केली होती. यावेळीही धोनी दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत होता. सर्वात आधी रोहित शर्माला धोनीने शुभेच्छा दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2018 3:15 pm

Web Title: ms dhoni connection between yuvraj singh sachin rohit and virat kohlis special record
Next Stories
1 IND vs WI : तिसऱ्या वन-डे आधी ‘टीम इंडिया’ला दिलासा
2 IND vs WI : बरोबरीत सुटलेल्या सामन्याबद्दल कुलदीप यादव म्हणतो…
3 IND vs WI : विराटची घाई नडली अन सामना बरोबरीत सुटला
Just Now!
X