News Flash

धोनीला भेटण्यासाठी ८७ वर्षीय महिला पोहोचली मैदानात

विशेष म्हणजे धोनीनेही या महिलेशी बराच वेळ गप्पा मारल्या.

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी याचे फॅन जगभरात आहेत. बऱ्याच दिवसांनंतर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलेला धोनी ऑस्ट्रेलियातील वनडे सिरीज खेळत आहे. जवळपास २ महिन्यांनंतर तो मैदानात परतला आहे. धोनीने आल्याआल्याच अर्धशतक करुन शानदार आगमन केले आहे. नुकताच सिडनीच्या क्रीकेट मैदानात सराव करत असताना एका ८७ वर्षाच्या महिलेने त्यांला गाठले. आपण तुझे खूप मोठे फॅन आहोत असे तिने धोनीला सांगितले. त्यानंतर धोनीनेही या आजींसोबत बराच वेळ घालवला. धोनी मैदानात सराव करत असताना ही महिला त्याठिकाणी पोहोचली आणि त्याला घेऊन बाजूला असलेल्या खुर्चीवर बसली. विशेष म्हणजे धोनीनेही या महिलेशी बराच वेळ गप्पा मारल्या.

यावेळी या वृद्ध महिलेने धोनीची आणि त्याच्या खेळाची तारीफ केली. यावेळी महिला म्हणाली, मी अतिशय नशीबवान आहे कारण मी एमएस धोनीला भेटले. मला खूप जास्त आनंद होत असून मला त्याचा अभिमान आहे. ती तिच्या मुलासोबत सिडनीच्या क्रीकेट मैदानावर धोनीला खेळताना पाहण्यासाठी आली होती. माझ्या आईसाठी हा अतिशय विशेष क्षण आहे. आजच्या काळातील डॉन ब्रॅडमन याला ती भेटल्याचा आनंद तिला झाला आहे असेही ते म्हणाले. या वयातही क्रीकेटचे असणारे वेड आणि आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी या आजींची असलेली धडपड खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ही घटना कॅमेरात कैद झाली आणि हा व्हिडियो व्हायरलही झाला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 2:16 pm

Web Title: ms dhoni gesture towards 87 year old fan viral video
Next Stories
1 VIDEO: ‘संदेसे आते है’ गाणाऱ्या BSF जवानाचे सोशल मिडियावर कौतुक
2 केरळमधील ७० वर्षीय चहाविक्रेते दाम्पत्य फिरले २० देश; आनंद महिंद्रांनी घेतली दखल
3 Video : जेव्हा जंगलाचे राजे प्रवाशांची वाट अडवतात
Just Now!
X