14 August 2020

News Flash

Video : धोनीचा नवा लूक पाहिलात का??

CSK ने ट्विटरवर शेअर केला व्हिडीओ

लॉकडाउन काळात सर्व भारतीय खेळाडू आपल्या परिवारासोबत वेळ घालवत होते. क्रिकेटच्या मैदानापासून दुरावलेल्या भारतीय खेळाडूंनी या काळात सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या सहकाऱ्यांशी गप्पा मारल्या. मात्र भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी या काळात सोशल मीडियापासून जरा दूरच होता. फार मोजके अपवाद वगळता धोनी लॉकडाउन काळात सोशल मीडियावर आला नाही. धोनी सध्या आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत रांची येथील आपल्या फार्महाऊसवर राहतो आहे.

अवश्य पाहा – ७ एकराच्या जागेवर उभं आहे धोनीचं रांचीमधलं अलिशान फार्महाऊस

१४ फेब्रुवारीपासून धोनीने आपलं ट्विटर अकाऊंट वापरलेलं नाही. हीच गोष्ट त्याच्या इतर सोशल मीडिया हँडलची आहे. लॉकडाउन काळात आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल याकडे धोनी लक्ष देत होता. प्रदीर्घ काळानंतर धोनीने चाहत्यांसाठी आपला नवा लूक शेअर केला आहे. चेन्नई सुपरकिंग्जने धोनीचा नवा लूक आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय.

२०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी सुमारे वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे धोनीचं हे पुनरागमन लांबणीवर पडलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 11:17 am

Web Title: ms dhoni makes rare appearance in a video shares new look for fans psd 91
Next Stories
1 ‘चांगुलपणा कधीच वाया जात नाही’ असं म्हणत बॉसने ‘त्या’ महिलेला भेट दिलं घरं
2 “काही महिन्यात बदलणार ‘हा’ लोगो”; Scotch Brite च्या Marketing Head ने ‘त्या’ पोस्टला दिलं उत्तर
3 फोटोतील कोणता झेब्रा पुढे आणि कोणता मागे?; सारं जग शोधतंय उत्तर
Just Now!
X