गुगल सर्चमध्ये एम.एस धोनी, सचिन तेंडुलकर आणि सनी लिओनी अव्वल स्थानावर आहेत. पण हीच नावे गुगल सर्चमध्ये सर्वात खतरनाकही आहेत. इंटरनेट सिक्यॉरिटी सॉल्यूशन्स कंपनी मॅकफे (McAfee)नं नुकतीच एक रिपोर्ट जाहीर केला आहे. यामध्ये सर्वात धोकादायक सेलिब्रिटी यांची यादी जाहीर केली. यामध्ये दिग्गज खेळाडूंपासून बॉलीवूडच्या अभिनेत्री-अभिनेत्यांचा समावेश आहे. मुख्य गोष्ट म्हणजे, या सेलिब्रिटींचे नाव सर्च केल्यानंतर व्हायरस असलेली नवी वेबसाईट ओपन होते. यात तुमच्या कम्प्युटरला हानी पोहचवणारे व्हायरस असतात. त्यामुळे गुगल सर्च करताना काळजी घ्या.

मॅकएफीने जाहीर केलेल्या यादीनुसार सर्चमध्ये सर्वात धोकादायक असलेल्यांमध्ये एम. एस धोनी अव्वल स्थानावर आहे. तर त्याच्या खालोखाल सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो. त्याच्यानंतर गौतम गुलाटी, राधिका आपटे, श्रद्धा कपूर, हरमनप्रीत कौर, पी. व्ही. सिंधू, सनी लिओनी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचा क्रमांक लागतो.

मॅकफेने दिलेल्या माहितीनुसार, या सेलिब्रेटिंच्या नावाच्या हजारो बनावट लिंक्स तयार करण्यात आल्या आहेत. या लिंक्स ओपन केल्यास हॅकर्स सर्च करणाऱ्याला मोठे नुकसान पोहचवू शकतात. यात बँकेची माहिती, आर्थिक नुकसान पोहोचवणे, किंवा डेटा चोरी करणे, मोबाइल हॅक करणे, कम्प्यूटर हॅक करणे, यासारखी माहितीची चोरी करू शकतात.

दरम्यान, सध्या गुगलवर धोनी हा कीवर्ड हा सर्वात धोकादायक असल्याचे मॅकफेनं आपल्या रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. मॅकफेनं जाहीर केलेल्या सेलिब्रिटींना सर्च करणे धोकादायक आहे. त्यामुळे मोबाइल किंवा कम्प्यूटर हॅक होऊ शकतो. सर्च करताना काळजी घेण्याचे अवाहन मॅकफेने आपल्या अहवालात म्हटलेय.