08 July 2020

News Flash

महेंद्रसिंह धोनी वळला ऑर्गेनिक शेतीकडे; कलिंगड आणि पपईची केली लागवड

सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

माणूस श्रीमंत असो किंवा गरीब…आयुष्याच्या एका क्षणापर्यंत काम करायचं आणि त्यानंतर गावाला जाऊन शेती करायची हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीही याला अपवाद नाहीये. सध्या भारतीय संघाबाहेर असलेला धोनी नवीन स्वरुपात समोर आला आहे. धोनीने रांचीत ऑर्गेनिक शेती करण्यास सुरुवात केली असून, त्याने कलिंगड आणि पपईची लागवड केली आहे. आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन धोनीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला. कालानुरुप धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारत वन-डे आणि टी-२० क्रिकेटकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मात्र २०१९ विश्वचषकानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देऊन ऋषभ पंतकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. यानंतर आतापर्यंत धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाहीये. आयपीएलच्या आगामी हंगामात धोनी चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळेल. त्यामुळे आगामी काळात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या निवृत्तीबद्दल कधी निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 7:51 pm

Web Title: ms dhoni started organic farming of watermelon in ranchi followed by papaya post video on facebook psd 91
टॅग Ms Dhoni
Next Stories
1 माहितीचा दुष्काळ पडणार; Wikipedia भारतात होणार बंद?
2 Realme X50 Pro 5G : कसा आहे देशातला पहिला 5G स्मार्टफोन?
3 Xiaomi वापरणार ISRO ची टेक्नॉलॉजी, ‘मेक इन इंडिया’ला देणार चालना
Just Now!
X