News Flash

Video : अन् भावूक झालेल्या चाहत्यानं मैदानातच धोनीच्या पायांना केला स्पर्श

चाहत्यांसाठी मात्र अजूनही तोच कर्णधार आहे

श्रीलंकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा सर्वोत्तम फलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि उत्तम निर्णयक्षमता यासाठी ओळखला जातो. आता जरी धोनी हा संघाचा कर्णधार नसला तरी त्याच्या चाहत्यांसाठी मात्र अजूनही तोच कर्णधार आहे. धोनी मैदानात कौणताही चमत्कार करू शकतो, अगदी आपल्या कुशल डावपेचांनी हरलेला डाव तो पुन्हा जिंकू शकतो, असा भाबडा विश्वास त्याच्या चाहत्यांचा आहे. चाहत्यांच्या या विश्वासाला धोनीनं कधीच तडा जाऊ दिला नाही. म्हणून आजही सचिन तेंडुलकरनंतर धोनीचे चाहते त्याला क्रिकेटचा दुसरा देवच मानतात. अशा या धोनीच्या पायाशी एखाद्या चाहत्यानं लोळण घातलं तर नवल वाटायला नको.

Video: पांड्या-धोनीमध्ये शर्यत, पाहा कोण जिंकलं

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात असाच प्रकार घडला. क्षेत्ररक्षासाठी मैदानात उभ्या असलेल्या धोनीला पाहताच एका चाहत्यानं मैदानाच्या दिशेनं धाव दिली. साक्षात धोनी समोर उभा असल्याचं दिसताच हा चाहता धोनीच्या अक्षरश: पाया पडला. हे दृश्य पाहून मैदानात चाहत्यांनी जल्लोष सुरू केला. या भावपूर्ण क्षणाचे छायाचित्र कॅमेरात कैद झाले आहे. ‘इंडियन क्रिकेट टीम’ च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 10:46 am

Web Title: ms dhonis fan touches his feet during live match
Next Stories
1 २०१७ मध्ये इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेला शब्द माहितीये का?
2 Video : तिनं मृत्यूला दोनदा दिली हुलकावणी
3 ही निळ्या डोळ्यांची ‘बाहुली’ सोशल मीडियावरची नवी स्टार
Just Now!
X