24 November 2020

News Flash

धोनीच्या निवृत्तीबाबत साक्षीचे स्पष्टीकरण, म्हणाली

धोनीच्या निवृत्तीबद्दल पुन्हा तर्क-वितर्क लावले जाऊ लागले

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी निवृत्त होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. गुरूवारी सायंकाळी पत्नी साक्षी धोनीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. साक्षी धोनीनं ट्विट करत अफवा पसरवणाऱ्याची हवा काढली आहे. साक्षीने आपल्या ट्विटमध्ये धोनी निवृत्त होणार असल्याच्या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी संघाची घोषणा करताना निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनीही धोनीच्या निवृत्तीचं खंडन केलं. धोनीच्या निवृत्तीसंबंधीच्या बातम्या चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

गुरूवारी सकाळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं केलेल्या ट्वीटमुळे धोनीच्या निवृत्तीबद्दल पुन्हा तर्क-वितर्क लावले जाऊ लागले. या फोटोमध्ये कोहली धोनीसमोर गुडघ्यावर बसलेला दिसत आहे. या फोटोला २०१६ टी-२० विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याचा संदर्भ होता. मात्र या फोटोमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली.

दरम्यान, यापूर्वीही अनेकदा धोनीच्या निवृत्तीच्या अफवा उडाल्या होत्या. २०१९ च्या विश्वचषकानंतर धोनी निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चा रंगली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 10:47 pm

Web Title: ms dhonis wife responds to speculation on retirement nck 90
Next Stories
1 Ind vs SA : कसोटी मालिकेत रोहित शर्माला सलामीला संधी
2 महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची बातमी निराधार – निवड समिती प्रमुख एम.एस.के.प्रसाद
3 Ind vs SA : कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, लोकेश राहुलला डच्चू
Just Now!
X