17 July 2019

News Flash

Video : केस कापण्यासाठी एकाचवेळी तो वापरतो २७ कात्र्या

हा व्हिडियो पाहून तुम्हीही थक्क व्हाल...

केस कापणे ही मुलांसाठी अतिशय सामान्य गोष्ट. न्हाव्याची जागा आता हेअरस्टायलिस्टने घेतल्याने जगात दिवसागणिक वेगवेगळे हेअरकट आणि ते करण्यासाठी पावलापावलावर पार्लरही उघडली जात आहेत. आता हेअरकट करण्यासाठी किती कात्र्या लागतात असे कोणी विचारले तर आपण अगदी सहज एक किंवा दोन असेच उत्तर देऊ. एका हातात कंगवा आणि दुसऱ्या हातात कात्री घेऊन न्हावी केस कापतो. पण पाकिस्तानमधील एक तरुण एक हेअरकट करण्यासाठी एकावेळी एक दोन नाही तर तब्बल २७ कात्र्या वापरतो. आता या कात्र्या तो नेमक्या हातात कशा पकडतो आणि त्यानंतर हेअरकट कसा होत असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचा हेअरकट करतानाचा हा व्हिडियो नक्की पाहा.

पाकिस्तानमधील गुंजरावाला भागात राहणारा मोहम्मद अवैस याच्या केस कापण्याच्या या अनोख्या पद्धतीबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर मोहम्मदचा व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याचे सर्वच स्तरातून जोरदार कौतुक होताना दिसत आहे. अवघ्या २६ वर्षाच्या मोहम्मदने सहा महिन्यांपूर्वीच आपले सलून सुरु केले. सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या जिद्दीतून त्याला ही अनोखी कल्पना सुचली. ही कला अवगत करण्यासाठी आपण खूप मेहनत घेतली असे तो म्हणतो. एका हेअरकटसाठी तो ग्राहकांकडून २५० रुपये घेतो. मात्र २७ कात्र्या दोन्ही हातात धरुन तो अतिशय सराईतपणे करत असल्याचे पाहून आपल्यालाही त्याचे कौतुक वाटल्यावाचून राहत नाही. सुरुवातीला सलूनमध्ये कमी लोक यायचे. पण आता लोकांपर्यंत मी करत असलेली अनोखी गोष्ट पोहोचली आहे आणि त्यांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. मोहम्मद मागील १० वर्षांपासून हे काम करत असून आता त्याचा या नव्या कौशल्यात हात बसला आहे.

First Published on December 7, 2018 12:43 pm

Web Title: muhammad awais barber from pakistan cut hairs with 27 scissors at a time video viral