22 July 2019

News Flash

मुकेश अंबानींनी आकाशच्या लग्नानिमित्त केलं ५० हजार पोलिसांचं ‘तोंड गोड’

५० हजार पोलिस कर्मचाऱ्यांना मिठाई भेट म्हणून पाठवली आहे

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुलाचा विवाहसोहळा या आठवड्यात संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त मुकेश अंबानी यांनी शहरातल्या ५० हजार पोलिस कर्मचाऱ्यांना मिठाई भेट म्हणून पाठवली आहे. या भेटीबरोबर वधू-वरासाठी त्यांनी आशीर्वादाही मागितले आहेत.

९ मार्चला आकाश अंबानी श्लोका मेहतासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. मुकेश अंबानी यांच्याकडून प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला मिठाई भेट म्हणून मिळाली आहे.

मिठाईच्या बॉक्समध्ये मुकेश अंबानी, निता अंबानी आणि त्यांच्या मुलांचं नाव असलेलं छोटसं कार्ड होतं. यात मिठाई होती पण त्याचबरोबर वधू वराला तुमचे आशीर्वाद हवेत असंही लिहिलं असल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्यानं दिली.

गुरूवारी अंबानी आणि मेहता कुटुंबानं अन्नसेवेचं आयोजन केलं होतं याद्वारे दोन हजार गरीब आणि अनाथ मुलांना मोफत अन्न देण्यात आलं होतं. ९ ते ११ मार्च असे तीन दिवस आकाश आणि श्लोका यांचा विवाहसोहळा रंगणार आहे. नुकतंच आकाश आणि श्लोकाचं प्री वेडिंग सेलिब्रेशन पार पडलं. या प्रीवेडींग पार्टीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदीयाळी पाहायला मिळाली.

First Published on March 8, 2019 4:11 pm

Web Title: mukesh ambani has sent boxes containing sweets to the around 50000 police personnel