News Flash

शाही विवाहसोहळ्यासाठी मुंबईचं कुटुंब लंडनमध्ये, ३७ वर्षांपूर्वी आई-वडिलांनी सुरू केली होती परंपरा

१९८१ मध्ये जेव्हा लेडी डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचा विवाहसोहळा पार पडला त्यावेळी अॅलन यांचे आई- वडील लंडनाला हा सोहळा पाहण्यासाठी आले होते.

१९ मेला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूड अभिनेत्री मेगन मर्केल यांचा शाही विवाह सोहळा शनिवारी पार पडणार आहे. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी मुंबईतलं एक कुटुंब चक्क ब्रिटनला पोहोचलं आहे. ३८ वर्षीय बिअँका आणि तिचे पती अॅलन १० वर्षांच्या मुलाला घेऊन लंडनमध्ये हजर झाले आहेत. १९ मेला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी जगभरातून अनेक लोक ब्रिटनमध्ये आले आहेत. यात बिअँका आणि अॅलन यांचाही सहभाग आहे. अॅलन यांचे आई-वडील शाही कुटुंबाचे मोठे चाहते आहेत. १९८१ मध्ये जेव्हा लेडी डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचा विवाहसोहळा पार पडला त्यावेळी अॅलन यांचे आई- वडील लंडनाला हा सोहळा पाहण्यासाठी आले होते. अॅलन तेव्हा २ वर्षांचे होते.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बिअँका म्हणाल्या की त्यांच्या सासू सासऱ्यानं ३७ वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली होती. २०११ मध्ये काही महत्त्वाच्या कामामुळे बिअँका आणि अॅलनला लग्नासाठी उपस्थिती लावता आली नाही पण यावेळी मात्र आम्ही आवर्जून लग्नासाठी उपस्थिती लावली आहे. सध्या जिथे तिथे शाही विवाहाची चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आम्ही आजचा दिवस इथला परिसर फिरून शाही विवाहसोहळा पाहणार आहोत.

उद्या सकाळी लवकर आम्ही मोक्याची जागा निवडून तिथे थांबणार आहोत. हा सोहळा पाहण्यासाठी अनेकजण येथे येणार आहे मेगन आणि प्रिन्स हॅरी यांचा विवाहसोहळा आम्हाला जवळून पाहायचा आहे म्हणूनच आम्ही येथे आलो असंही त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 4:45 pm

Web Title: mumbai family flies to london for royal wedding
Next Stories
1 VIRAL : खड्डे बुजवण्याची कल्पना कशी वाटली ? पुढच्यावेळी आपणही असंच करू!
2 फेकन्युज : नेहरू संघाच्या शाखेत?
3 फेकन्युज : प्राण्यांनाही सोडत नाहीत!
Just Now!
X