News Flash

Viral : मुंबई पोलीसही म्हणतात, ‘घर से निकलतेही..’

'घर से निकलते ही' मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, तेव्हा मुंबई पोलिसांनीही या मीम्सला हटके ट्विस्ट देऊन हेल्मेटचं महत्त्व पटवून सांगितलं आहे.

. मुंबई पोलिसांचं हे ट्विट आतापर्यंत साडेचार हजारांहूनही अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे.

मुंबई पोलिसांचं ट्विटर हँडल नेहमीच त्यांच्या हटके ट्विटसाठी प्रसिद्ध आहे. हजरजबाबी आणि भन्नाट विनोदशैली यांची सांगड घालून तयार केलेले मीम्स अनेकदा सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांचं ट्विटर हँडल जो कोणी हाताळत आहे त्याच्या डोकॅलिटीवर तरुण अक्षरश: फिदा आहेत. वाहतुकीचे वेगवेगळे नियम समजावून सांगताना गाणं, विनोद किंवा चित्रपटातले प्रसिद्ध डॉयलॉग वापरून अनेक गोष्टी ते नागरिकांना समजावून सांगतात. तर यावेळी हॅल्मेट का गरजेचं आहे हे समजावून सांगताना त्यांनी ‘घर से निकलते ही’ हे गाणं वापरून मीम तयार केले आहे.

अरमान आणि अमाल मलिक यांनी ९० च्या दशकातील गाजलेल्या ‘घर से निकलते ही’ या गाण्याचा रिमेक केला. हे गाणं सोशल मीडियावरही ट्रेंड होत आहेत. याला छानसा ट्विस्ट देत हेल्मेट न घालता घरातून निघाल्यावर काय होतं ते मुंबई पोलिसांनी या मीम्सच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई पोलिसांचं हे ट्विट आतापर्यंत साडेचार हजारांहूनही अधिक लोकांनी रिट्विट केलं आहे.

अनेकजण कोणतीही अडचण आली की ट्विट करून मुंबई पोलिसांकडे मदत मागतात. या ट्विटला तत्परतेनं उत्तर देत मुंबई पोलीस नेहमीच मदत करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच मुंबई पोलिसांची ट्विटरवर फॅन फॉलोइगही सर्वाधिक आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 12:50 pm

Web Title: mumbai police gives ghar se nikalte hi meme a very cool twist
Next Stories
1 मेट्रो स्थानकावर खाल्लं बर्गर , पोटात गेलं प्लास्टिक तर गळ्याला झाली इजा
2 VIDEO : …आणि त्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी आली ७० पोलीस अधिकाऱ्यांची कुमक
3 Jumbo ‘royal’ cake: ब्रिटनच्या राजघराण्यातील लग्नाच्या निमित्ताने तिने बनवला ‘रॉयल’ केक
Just Now!
X