सोशल मीडियावर मंगळवारचा दिवस चर्चेचा राहिला होता. याचं कारणं म्हणजे ट्विटरवर सुरू करण्यात आलेले हॅशटॅग. एकीकडे महिलांनी ट्विटरवर रंगबिरंगी साड्यांमधील #SareeTwitter या हॅशटॅगबरोबर आपले फोटो शेअर केले होते. तर दुसरीकडे आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेले पोलीस बांधवही मागे नव्हते.

पोलिसांनी #KhakiTwitter या हॅशटॅगवरून आपला खाकी स्वॅग दाखवल्याचं पहायला मिळालं. मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून #KhakiTwitter आणि #KhakiSwag अशा हॅशटॅगवरून एक मेसेज शेअर केला आहे. आपल्याला ज्या युनिफॉर्मवर अभिमान आहे, त्या युनिफॉर्ममधील आपला एक फोटो टॅग करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

तसेच जास्तीतजास्त लोकं याच्याशी जोडली जावी यासाठी यामध्ये त्यांनी पोलिसांना टॅग करण्याचंही आवाहन केलं आहे.