एकदम हटके पोस्ट शेअर करण्यासाठी मुंबई पोलीस ओळखले जातात. ते सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या पोस्टद्वारे ते आपल्याला काही ना काही मेसेज देण्याचा प्रयत्न करत असतात. सायबर फसवणुकीविषयी जागरूकता निर्माण करण्यापासून ते लोकांना साथीच्या नियमांची आठवण करून देणेतसेच वाहतुकीचे नियम लोकांना अधोरेखित करण्यापर्यंतच्या आशयांच्या त्यांच्या पोस्ट असतात. त्यांनी नुकतीच गेलेली एक पोस्ट ‘अतुट प्रतिकारशक्ती’ अर्थात न तुटणारी प्रतिकारशक्ती बनविण्याचा मार्ग दाखवणारी ही पोस्ट आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्ट शेअर केल्यापासून पोस्टला इस्टाग्रामवर ५,००० हून अधिक लाइक्स आले आहेत आणि ही संख्या वाढतच आहे. ही पोस्ट मास्क संबंधित आहे. त्यांनी पोस्टमध्ये दाखवलं आहे की मास्क असेल तर करोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. ते कॅप्शनमध्ये लिहतात की, ” जास्तीचा मास्क तुमची प्रतिकारशक्ती न तुटू देण्यासाठी काम करते.” या पोस्ट सोबत त्यांनी आज आणखीन एक मजेशीर पण महत्त्वपूर्ण पोस्ट मुंबई पोलिसांनी केली आहे. त्यांनी या नवीन पोस्टमध्ये मुंबईतील महत्त्वाची, फिरण्याची ठिकाण आणि बेस्ट बसला घेऊन मास्क घालणं किती महत्त्वाचं आहे हे दाखवून दिल आहे.

नेटीझन्सच्या मिक्स प्रतिक्रिया

“मुंबई पोलिस तुमचं हे काम असच चालू ठेवा” एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने कौतुक केले. “या पोस्टची क्रियेटीव्हीटीची पातळी सर्वोत्तम आहे,” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली. काही लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी फायर इमोटिकॉन्स देखील शेअर केले. काहींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. हा नियम फक्त सामान्य लोकांसाठी आहे का? असा प्रश्नही त्यांनी कमेंट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

मुंबई पोलिसांची आजची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या पोस्टवर तुमचे काय मत आहे?