News Flash

Viral Video : आजच नाही तर १९३२ सालीही पावसामुळे मुंबापुरीची झाली होती तुंबापुरी

८८ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

(Photo: Youtube/Brut India)

मुंबईत काल संध्याकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. रस्त्यावरील वाहतूक मंदावली असून मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवाही कोलमडली आहे. दरवर्षी काही तासांच्या मुसळधार पावसानंतर मुंबई आणि लगतच्या परिसरात अशीच स्थिती निर्माण होते. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. मात्र अशाप्रकारे या वर्षी पहिल्यांदाच मुंबईमध्ये थेट सार्वजनिक वाहतूक सेवेवर परिणाम होण्याएवढा पाऊस पडला असला तरी मुंबईमध्ये अशाप्रकारे पाणी तुंबण्याचे प्रकार मागील ८६ वर्षांपासून होत असल्याचे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

युट्यूबवर ‘ब्रट इंडिया’ या चॅनलवरुन मागील वर्षी पोस्ट करण्यात आलेला एक व्हिडिओ आत मुंबई आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. ‘Mumbai Was Getting Flooded Even In 1932’ म्हणजेच १९३२ सालीही मुंबईमध्ये पाणी तुंबायचे अशा मथळ्याखाली हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला देण्यात आलेल्या व्हाइस ओव्हरमध्ये मुंबईत त्यावेळी २४ तासांमध्ये २२ इंच पाऊस झाल्याचे सांगण्यात आलं आहे. मागील ४४ वर्षांचे सर्व विक्रम पावसाने मोडले आहेत असंही सांगण्यात आलं आहे. म्हणजेच १९३२ पूर्वी १८८८ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबईत पाऊस झाला होता.

नक्की पाहा >> Viral Video : झोपेतच पॅण्टमध्ये घुसला कोब्रा घुसला ; भीतीमुळे सात तास एकाच जागी राहिला उभा

या व्हिडिओमध्ये अनेक मुंबईकर छत्र्या घेऊन फिरताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये मुंबईतील काही मुख्य रस्त्यांवर साचलेल्या पाण्याबरोबर धोबी घाट, रुळांवर पाणी साचलेले असताना चालणारी रेल्वे अशी दृष्येही दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये बंद पडलेल्या मोटरगाड्या चक्क बैलगाडीच्या मदतीने खेचल्या जात असल्याचे दिसून येत आहे. गाडी पावसाच्या पाण्याने बंद पडल्याने बैलगाडीला दोरखंडाने बांधून नेली जाताना दिसत असून गाडीच्या मागून सूट घालून चालक छत्रीमध्ये चालत असल्याचे एका दृष्यात दिसते.

धोबी घाटचे काही एरियल शॉर्टसही व्हिडिओमध्ये आहेत. या ठिकाणी स्थानिक महिला दर सोमवारी कपडे धुवायला येतात. मात्र आज परिस्थिती तशी नाही आज पोहता येत नसल्याने महिला कपडे धुण्यासाठी येऊ शकत नाहीत असं या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देणारी व्यक्ती म्हणते. अगदीच उपहासात्मक पद्धतीने या परिस्थितीचे वर्णन व्हिडिओमध्ये केल्याचे पाहयला मिळत आहे.

नक्की पाहा >> Viral Video : काही फूटांवरुन ‘उडत आला’ रिक्षाचालक आणि…

तिसऱ्या दृष्यामध्ये दरवर्षी मुंबई करणांच्या परिचयाचे चित्र दिसत आहे. रुळ दिसत नाही एवढं पाणी चाललेलं असतानाही त्यामधून रेल्वे गाड्या जाताना दिसत आहेत. आज ज्याप्रमाणे आपल्याला दिसत त्याचप्रमाणे गाडीच्या दारामध्ये लोकं उभं राहून प्रवास करत असल्याचे व्हिडिओत दिसते.

हा व्हिडिओ पाहिल्यावर खरोखरच मुंबई मागील ८८ वर्षात जराही बदलली नाही असे म्हणाता येईल, अशा स्वरुपाची एक कमेंट व्हिडिओखाली असल्याचे पहायला मिळत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यावर काय वाटले कमेंट करुन नक्की कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 3:09 pm

Web Title: mumbai rains mumbai was getting flooded even in 1932 scsg 91
Next Stories
1 Viral Video : झोपेतच पॅण्टमध्ये घुसला कोब्रा घुसला ; भीतीमुळे सात तास एकाच जागी राहिला उभा
2 मर्दानी… अन् तरुणीनं शेपटीने ओढत शार्कला असं वाचवलं, व्हिडीओ व्हायरल
3 महात्मा गांधींना इंग्रजांची अनोखी मानवंदना; तुम्हालाही वाटेल अभिमान
Just Now!
X