25 February 2021

News Flash

…म्हणून कोट्यवधी किंमतीच्या हस्तीदंतांची केली राखरांगोळी

तब्बल ९ कोटींहून अधिक किंमतीच्या हस्तीदंतांची सार्वजनिक होळी पेटवली आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र

अवैधरित्या हस्तीदंताची तस्करी ही सर्वात मोठी समस्या ठरत आहे. आफ्रिकेतील अनेक देशांची ही मोठी समस्या आहे. मात्र या समस्येमुळे मान्यमारसारखा देशही त्रस्त आहे. हस्तीदंतांसह अन्य प्राण्यांच्या अवयवयाची होणारी तस्करी रोखण्यासाठी या देशानं जप्त केलेले तब्बल ९ कोटींहून अधिक किंमतीच्या हस्तीदंतांची सार्वजनिक होळी पेटवली आहे.

म्यानमारच्या नैसर्गिक स्त्रोत मंत्रालयाद्वारे २७७ हस्तीदंत, २२७ प्राण्यांची हाडे, प्राण्यांची कातडी, फर आणि १ हजारांहून अधिक शिंगांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. अशा कृतीतून तस्करीला रोख बसेल असं म्यानमारच्या मंत्रालयानं म्हटलं आहे.  यापूर्वीही तस्करी रोखण्यासाठी आफ्रिकेतील देशानं जप्त केलेले हस्तीदंत जाळून टाकले होते. चीनच्या काळ्या बाजारात हस्तीदंताना मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक मुक्या जीवांची शिकार करून त्यांना ठार मारलं जातं. ही समस्या इतकी मोठी आहे की दरवर्षी आफ्रिकेमध्ये शेकडो हत्तींची हस्तीदंतासाठी आमानुषपणे शिकार केली जाते. या कृतीतून तस्करांना हा इशारा देण्यात आला आहे असं म्यानमारच्या मंत्रालयानं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 5:42 pm

Web Title: myanmar burns ivory to fight illegal wildlife trade
Next Stories
1 क्रूजवर पिकनीकसाठी गेलेल्या 1300 भारतीयांनी कापलं देशाचं नाक, परदेशी म्हणाले हे लज्जास्पद
2 जुलैपासून बेपत्ता असलेल्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीला ९५१ कोटींचा दंड
3 Video : तुम्ही ऑनलाइन फूड ऑर्डर करता? मग डिलिव्हरी बॉयचा हा प्रताप पाहाच
Just Now!
X