दिवसोंदिवस जगभरामध्ये करोनाबाधितांचा आकडा वाढतानाचे चित्र दिसत आहे. अगदी अमेरिकेसारख्या महासत्तेलाही करोनामुळे मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असणाऱ्या अमेरिकेमध्ये पूर्ण लॉकडाउनची घोषणा कधीच करण्यात आलेली नव्हती तरी तेथील लोकं आता करोनासंदर्भातील निर्बंधांना विरोध करु लागले आहेत. अगदी मास्क न घालण्यापासून ते करोनासंदर्भात जे काही निर्बंध घातले आहेत ते उठवण्यासाठी एकत्र येऊन आंदोलन करण्यापर्यंत अनेक गोष्टींच्या माध्यमातून अमेरिकन लोकं विरोध करत आहेत. मागील अनेक आठवड्यांपासून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी अमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये तेथील राज्यापालांनी वेगवेगळे निर्बंध लादले होते. मात्र आता या निर्बंधांना विरोध करत अनेकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आणि गेट टू गेदरचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. याच पद्धतीची एक आगळीवेगळी स्पर्धा पेनसिल्व्हेनिया राज्यात पार पडली. या स्पर्धेचे नाव होते नेकेड पॅनडॅमिक रेस. अगदी नावाप्रमाणे या धावण्याच्या स्पर्धेमध्ये स्पर्धक नग्न होऊन भाग घेणं अपेक्षित होतं. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पेनसिल्व्हेनियामधील पालमेरटॉन येथील सनी रेस्ट रिसॉर्ट या न्यूड रिसॉर्टमध्ये ही स्पर्धा पार पडली. करोनामुळे मॅरेथॉन आणि धावण्याच्या इतर स्पर्धा रद्द करण्यात आल्याने रिसॉर्टमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. “करोना साथीच्या काळात जिथे आपल्याला अगदी तोंडावरही मास्क घालावं लागत आहे तिथे अंगावरील सर्व कपडे काढून का सहभागी होऊ नये? या भिती, तणाव, दु:ख आणि निराशेच्या वातावरणामध्ये वेगळेच स्वातंत्र्य अनुभवता आलं,” असं या स्पर्धेत सहभागी झालेल्या जेना मिलर यांनी म्हटलं आहे. टाइम्सच्या साप्ताहिकामध्ये काम करणाऱ्या मिलर यांचा अनुभव न्यू यॉर्क टाइम्सने आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

In a naked pandemic race, you can leave your hat on.⁣ ⁣ Almost all marathons and other large running events were canceled this year because of the coronavirus crisis. But the Bouncing Buns Clothing Optional 5K, held at the Sunny Rest Resort, a nudist resort in Palmerton, Pennsylvania, went on as planned.⁣ ⁣ “In this pandemic season of covering our faces in public, why not uncover everything else?” writes @jenamillerrunner (4th photo), a race participant and author of The Times’s weekly running newsletter. “What a fun way to experience some freedom in a time of pressing fear, grief, restrictions and disappointments.”⁣ ⁣ Sunny Rest was founded as a nudist resort in 1945 and, except for the lack of clothing, looks like a lot of other campgrounds, with mobile homes, cabins, tents and RVs. It’s private property, so laws against public nudity are not an issue. Pretzel City Sports, which organized the Bouncing Buns 5K, has been putting on races there for 13 years.⁣ ⁣ “Not enough of us do things outside the box anymore, particularly as we get older,” said Ron Horn (2nd photo), the race director and co-owner of Pretzel City Sports.⁣ ⁣ Tap the link in our bio for @jenamillerrunner’s full account of the race. Photos by @michellegustafson.⁣ ⁣

A post shared by The New York Times (@nytimes) on

या शर्यतीमधील एक फोटो लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही ट्विटवरुन शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक धावताना दिसत आहेत. ही शर्यत पार पडली मात्र त्यामध्ये सर्वांनी  बूट घातले होते असं निरिक्षण तस्लिमा यांनी नोंदवलं आहे. “अमेरिकेमध्ये नेकेड पॅनडॅमिक रेस पार पडली. मात्र यामध्ये सर्वांनी बूट आवर्जून घातले होते,” अशी कॅप्शन तस्लिमा यांनी फोटोला दिली आहे. या स्पर्धेत नग्न होऊन अंगावरील सर्व गोष्टी काढून पळणं अपेक्षित असताना स्पर्धांनी बूट मात्र घातले होते यावर तस्लिमा यांनी मजेशीर कमेंट केली आहे.

सोशल नेटवर्किंगवर काही जणांनी या आगळ्या वेगळ्या शर्यतीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत तर काहींनी या गोष्टीवर टीका केली आहे.