फ्रान्सचा सम्राट नेपोलीयन बोनापार्ट याने आपली पत्नी एंप्रेस जेसोफेनला लिहलेल्या प्रेमपत्रांचा पॅरिसमध्ये लिलाव करण्यात आला. १७९६ ते १८०४ दरम्यान लिहिलेल्या या प्रेमपत्रांना ५,१३००० युरो म्हणजे ४ कोटी १८ हजार अशी विक्रमी किंमत मिळाली. एकूण तीन पत्रांचा लिलाव करण्यात आला. १७९६ साली नेपोलिअन इटलीच्या मोहिमेवर असताना त्याने ही प्रेमपत्रे आपल्या पत्नीला लिहीली होती.

नेपोलियन आणि जेसोफेन यांचा विवाह मार्च १७९६ साली झाला होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्राचा देखिल लिलाव करण्यात आला होता.या प्रमाणपत्राला ९३ लाख ४२ हजार रुपये इतकी किंमत मिळाली होती. काही इतिहास तज्ञांच्या मते प्रमाणपत्रावरील तारीख ८ मार्च १९९६ असली तरी त्यांचा विवाह कोणा दुसऱ्याच दिवशी झाला होता. त्यांच्या लग्नाची नोंदणी पॅरीस येथे झाली होती. नेपोलिअन आणि जेसोफेन एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असले तरी ते दोघे पक्के व्यवहारी होते. लग्नानंतर दोघांनी काही कायदेशीर करार केले होते. त्या करारात पती व पत्नी एकमेकांच्या कर्जास जबाबदार राहणार नाहीत. तसेच एकमेकांच्या संपत्तीवरही हक्क दाखवणार नाही अशी विचीत्र कलमे लिहीली गेली होती. १७व्या शतकात त्यांची गाजलेली प्रेमकथा शेवटी मुल न झाल्याने १८०९ साली संपुष्टात आली. १६ डिसेंबर १९०९ साली त्यांनी घटस्फोट घेतला.

काय आहे पत्रात?

सखे, गेल्या काही दिवसांत तुझ्याकडून कोणतंच पत्र मिळलं नाही. कदाचीत तू नक्कीच कुठल्या तरी महत्त्वपूर्ण कामात मग्न असशील. म्हणूनच तू पतीला पत्र लिहिले नाहीस. पण, तुझा पती त्याच्या व्यग्र कामकाजातही फक्त तुझाच विचार करत असतो.