भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितल्याने खडसे भाजपमध्ये राहतात की जातात, हा प्रश्न निकाली निघाला आहे. बुधवारी राज्यातील राजकारणात घडलेल्या या घडामोडीचे पडसाद सोशल मीडियावरही पहायला मिळाले. सोशल मीडियावर #EknathKhadse हा टॉप ट्रेण्डींग हॅशटॅगपैकी एक होता. तसेच मराठीमधूनही या विषयासंदर्भात अनेक ट्विट करण्यात आल्याचे पाहायला मिळालं. मात्र या सर्वांबरोबरच भाजपाचे नेते नारायण राणे यांचे जुने ट्विटही चर्चेत आल्याचे चित्र बुधवारी दिसून आलं.

चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये खडसे विरुद्ध फडणवीस असा वाद सुरु असताना त्यावेळी काँग्रेसमध्ये असणाऱ्या राणे यांनी ट्विटरवरुन फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचा राजकीय बळी घेतला असून भाजपामध्ये बहुजन नेतृत्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असं ट्विट राणेंनी केलं होतं.

याचबरोबर राणे यांनी अन्य एका ट्विटमध्ये, “एका बाजूला एकनाथ खडसेंना क्लीनचीट दिल्याचे मुख्यमंत्री सांगतात, दुसऱ्या बाजूला दिल्लीत जाऊन खडसेंचा राजीनामा घ्यायची विनंती करतात,” असा टोला तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीस यांना लगावला होता.

खडसे यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर कालपासून हे ट्विट पुन्हा चर्चे आलं असून अनेकांनी या ट्विटला आता रिप्लाय देण्यास सुरुवात केली आहे. पाहुयात असेच काही रिप्लाय

१)

२)

३)

४)

५)

६)

दरम्यान, उद्या म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे पक्ष प्रवेश करणार आहेत.