इंधनदरवाढीमुळे पेट्रोलच्या किंमतीने शंभरी ओलांडली आहे. डिझेलच्या दरांचीही वाटचाल शंभरीच्या दिशेने सुरु झालीय. असं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक जुनं ट्विट पुन्हा चर्चेत आलं आहे. हे ट्विट ९ वर्षांपूर्वीचे म्हणजेच २०१२ सालातील आहे. मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना त्यांनी पेट्रोल दरवाढीवरुन तत्कालीन केंद्र सरकारला धारेवर धऱलं होतं. पेट्रोल दरवाढीमुळे गुजरातवर मोठा आर्थिक भार पडेल असं मोदींनी म्हटलं होतं. आता नेटकऱ्यांनी इंधनाच्या दरांनी तीन आकडी संख्या गाठली असतानाच मोदींना या ट्विटची आठवण करुन दिलीय.

मोदी नक्की काय म्हणाले होते?

jallianwala bagh 105 years
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक

पेट्रोलच्या दरांमध्ये झालेली वाढ ही काँग्रेच्या नेतृत्वामध्ये सत्तेत असणाऱ्या युपीए सरकारचं अपयश दाखवतं. यामुळे गुजरातवर हजारो कोटींचा आर्थिक भार येईल, असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं. हे ट्विट २३ मे २०१२ रोजी करण्यात आलं होतं.

आता अनेकांनी या ट्विटला रिप्लाय देण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये इंधनदरवाढ झालेली असताना ही दरवाढ म्हणजे आता केंद्रात सत्तेत असणाऱ्या सरकारचं अपयश नाहीय का असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. अनेकांनी या ट्विटखालीच मजेदार रिप्लाय देण्यास सुरुवात केलीय. पाहुयात नेटकऱ्यांनी नक्की काय म्हटलं आहे.

१) दरवाढीसाठी जबाबदार कोण?

२) भक्त म्हणतील

३) जुनी ट्विट कधीतरी वाचत जा

४) जुन्या भाषणाचाही दिला संदर्भ

५) नवा दर

६) तेवढच फेका जेवढं…

७) करेक्शन…

८) गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करावं

९) दरवाढ

१०) आताचे दर कोणाचं अपयश?

११) करेक्शन पुन्हा एकदा

१२) भाजपाला मत न देण्यांनाही फटका

अशाप्रकारे मोदींचं ट्विट व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मोदींनी गुजरातचे पंतप्रधान असतानाच केलेली वक्तव्यांच्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत.