अमेरिकेत अभूतपूर्व सत्तासंघर्ष सुरु असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत म्हणजेच कॅपिटॉल इमारतीबाहेर जोरदार गोंधळ घातला असून हिंसाचार केला आहे. ट्रम्प समर्थक हजारोंच्या संख्येने इमारतीबाहेर जमा झाले होते. जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प समर्थकांनी गोंधळ घालत हिंसाचार करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान यावेळी झालेल्या पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. या हिंसाचाराचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. मोदींनी लोकशाहीचा संदर्भ देत या घटनेमुळे दु:ख झाल्याचं म्हटलं आहे. मात्र मोदींनी लोकशाहीचा उल्लेख करत केलेल्या या ट्विटवरुन मोदी विरोधक आणि समर्थक आमने सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

नक्की पाहा हे फोटो >> खुर्चांखाली लपलेले नेते, हिंसक आंदोलक अन् आरडाओरड… अमेरिकन संसदेतील थरार

राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार केला गेला आहे. अमेरिकेच्या संसदेत तोडफोड करण्यात आली आहे. जगभरात या घटनेचे पडसाद उमटले असून यावर जगाच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर भाष्य केलं असून हिंसाचाराच्या बातम्या पाहून आपण दु:खी झाल्याचं म्हटलं आहे. वॉशिंग्टन डी. सी. मधील दंगल आणि हिंसाचाराच्या बातम्या पाहून अस्वस्थ झालो. शांततेच्या मार्गाने योग्य पद्धतीने सत्ता हस्तांतरण झालं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या निषेधाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेला डाग लागता कामा नये, अशा अर्थाचं ट्विट मोदींनी केलं आहे.

मात्र मोदींनी केलेल्या या ट्विटखाली त्यांच्यावर टीका करणारे आणि त्याचं समर्थन करणारे शाब्दिक वाद घालत असल्याचे चित्र दिसत आहे. पाहूयात ट्विटवरील मोदी समर्थक आणि विरोधकांचे नक्की काय म्हणणे आहे.

नक्की वाचा >> ट्रम्प यांनीच हिंसा घडवून आणल्याचा घणाघात करत ओबामांचं अमेरिकन जनतेला भावनिक आवाहन, म्हणाले…

मोदींचे विरोधक म्हणतात…

१) तुम्ही तेव्हा काय बोलला होता

२) कोण बोलत आहे बघा

३) तुम्ही त्यांच्यावर भारतीयांचे १०० कोटी उडवले

४) त्यांच्याबद्दल पण काहीतरी बोला

५) सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही

६) तेव्हा नाही काही झालं

७) बाहेरच्यांनी बोलू नये असं म्हणाला होता तुमचा पक्ष

८) यावर पण दोन शब्द बोला

९) हे विसरलात का

१०) रोज दोन शेतकरी

११) मला वाटतं

१२) मिम्सच्या माध्यमातूनही प्रतिक्रिया

१३) त्याने त्रास झाला पण…

१४) भारतातही होईल

१५) आपल्याकडचं बोला

मोदींचे समर्थक म्हणतात…

१) मोदींनी ट्रम्प यांना समर्थन दिलं कारण

२) मोदींनी कधी ती जाहिरात केलीच नव्हती

३) दिल्लीच्या आंदोलनाचं पण बघा

४) मला हे लॉजिक समजत नाही

५) शेतकऱ्यांबरोबरच चर्चेच्या सात फेऱ्या झाल्यात

६) तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे बोलायचं कळतंय का?

दरम्यान, अमेरिकेच्या राजधानीमध्ये सुरु असणारा हिंसाचार तब्बल चार तास सुरु होता. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जवळपास चार तास संघर्ष सुरु होता. चार तासांनी पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं. हिंसाचार करणाऱ्या ५२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कर्फ्यू असतानाही नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तसंच कॅपिटॉलमधील हिंसाचार प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.