अंतराळात गुरुत्त्वाकर्षण शक्ती शून्य असते, त्यामुळे अंतराळात वस्तूच काय अगदी माणूसदेखील हवेत तरंगत असतो. अशा ठिकाणी खाणं किंवा इतर हालचाली करणं किती अवघड आहे, हे आपण अनेकदा सोशल मीडियावरील व्हिडिओजच्या माध्यमातून बघितले असेल. मात्र, सध्या सोशल मीडियावर अंतराळातील एका पिझ्झा पार्टीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. नासाच्या अंतराळवीरांची एक टीम सध्या एका अंतराळ मोहिमेवर आहे. या टीमसाठी नासानं खास पिझ्झा तयार करण्याचं साहित्य अंतराळात पाठवलं होतं. त्यावेळी या संपूर्ण टीमनं शून्य गुरुत्त्वकर्षणशक्तीत पिझ्झा तयार करून खाल्ला.

Viral Video : ‘हा’ अफलातून डान्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल

त्याचं झालं असं की इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या अंतराळवीरांना आईस्क्रीम आणि पिझ्झा खाण्याची फार इच्छा झाली होती. म्हणूनच अमेरिकेतल्या व्हर्जिनिया येथून रविवारी सकाळीच आइस्क्रीम आणि पिझ्झाचं साहित्य इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचलं. अर्थात शुन्य गुरुत्वाकर्षणात पिझ्झा आणि पिझ्झाचं सामान हवेत उडत होतं. जिथं माणूसही धड उभा राहू शकत नाही, तिथं पिझ्झा कसा बनवायचा हा प्रश्न होताच. पण, तरीही हे सगळं व्यवस्थित मॅनेज करत साऱ्या अंतराळवीरांनी पिझ्झा तयार केला आणि त्यावर ताव मारला.