06 March 2021

News Flash

…अन् आकाशात चंद्राऐवजी पृथ्वीच उगवली; वाचा ‘नासा’ने शेअर केलेल्या या भन्नाट फोटोची गोष्ट

हा फोटो ५२ वर्षांपूर्वीचा म्हणजेच १९६८ मधील आहे

(फोटो सौजन्य : instagram/nasa वरुन साभार)

सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या असाच एक भन्नाट फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो पोस्ट केला आहे अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असणाऱ्या नासाने. नासाने त्यांच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या फोटोमध्ये चंद्राऐवजी आकाशात पृथ्वी उगवल्याचे दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे. तर हे शक्य आहे कारण हा फोटो चंद्रावरुन काढलेला आहे. बरं हा फोटो नेमका कालच म्हणजे २४ डिसेंबर रोजी पोस्ट करण्यामागेही विशेष कारण असून या फोटोबद्दलच्या काही खास गोष्टी नासाने आपल्या पोस्टमध्ये सांगितल्या आहेत. ११ तासांमध्ये या फोटोला ११ लाखांहून अधिक जणांनी लाईक केलं असून यावरुनच या फोटोसंदर्भात किती चर्चा होतेय याचा अंदाज तुम्हाला बांधता येईल.

नासाने शेअर केलेला हा फोटो ५२ वर्षांपूर्वीचा म्हणजेच १९६८ सालातील आहे. या फोटोला कॅप्शन देताना नासाने एक ओळीत फोटोचं वर्णन करताना, “इथून दिसणारी पृथ्वी ही रिकाम्या अंतराळामध्ये वाळवंटात एखादा हिरवळीचा टापू दिसावा अशी वाटतेय” असं म्हटलं आहे. फोटोबद्दल सविस्तर माहिती देताना नासाने, “हे ह्युस्टनमधील सकाळच्या साडेदहा वाजता घडलं होतं डिसेंबर २४, १९६८ रोजी, म्हणजेच ५२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी. अपोलो ८ मधील नासाचे अंतराळवीर फ्रँक बोरमॅन, जीम लव्हली आणि बिल अ‍ॅण्ड्रेस हे चंद्राभोवती प्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले व्यक्ती ठरते. त्यावेळी त्यांनी अशाप्रकारे चंद्राच्या पृष्ठभागावरुन होणारा पृथ्वीचा उदय पाहिला,” असं म्हटलं आहे.

या फोटोला अर्थराईज म्हणजेच पृथ्वीचा उदय या नावाने ओळखलं जातं असही नासाने सांगितलं आहे. हा फोटो अपोलो ८ मधील अंतराळवीर बिल अ‍ॅण्ड्रेस यांनी काढला आहे. तेव्हा पहिल्यांदाच हा असा फोटो जगाने पाहिला होता. हा अर्थराईजचा फोटो या ग्रहावर राहणाऱ्या आपल्या सर्वांना कायमच प्रेरणा देत राहील, असं नासाने या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by NASA (@nasa)

या फोटोवर नेटकऱ्यांनी हार्ट आणि लव्ह इमोंजीचा पाऊस पाडल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2020 10:29 am

Web Title: nasa shared a photo of earthrise on 52nd anniversary internet goes gaga over it scsg 91
Next Stories
1 सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीमध्येच साकारली आर्ट गॅलरी; कलाप्रेमींनी केली तुफान गर्दी
2 Viral Story: एका हेअरकटने बदललं या बेघर व्यक्तीचं आयुष्य; जगभरात ठरतोय चर्चेचा विषय
3 Viral Video: महिंद्रांनी केली भन्नाट बैलगाडीची थेट Tesla शी तुलना; म्हणाले…एलन मस्कलाही हे शक्य नाही!
Just Now!
X