24 February 2021

News Flash

ICC पुरस्कारांमध्ये विराट सर्वोत्तम ठरल्यानंतर नसीरुद्दीन शाह झाले ट्रोल, पाहा व्हायरल मिम्स

विराटला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांना त्रास होतोय असं नेटकऱ्यांच म्हणणं आहे

मिम्स झाले व्हायरल

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने २०१८ च्या आयसीसी पुरस्कारांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू, सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटीपटू असे मानाचे तीन्ही पुरस्कार विराटने आपल्या खिशात घातले आहेत. सलग दुसऱ्या वर्षी त्याला सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम वन-डे क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे. एकाच वेळी तिन्ही पुरस्कार जिंकण्याचा पराक्रम करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. विराटच्या या विराट यशानंतर ट्विटवरुन अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पण त्याचवेळी अनेकांनी ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनाही या विराट कामगिरीनंतर सोशल नेटवर्किंग साईटवर ट्रोल केले आहे.

आता विराटला पुरस्कार मिळाल्यानंतर नेटकऱ्यांनी महिन्याभरापूर्वी नसीरूद्दीन शाह यांनी फेसबुकवर लिहीलेल्या एका पोस्टवरुन त्यांना लक्ष्य केले आहे. शाह यांनी १७ डिसेंबर २०१८ रोजी फेसबुकवर लिहीलेल्या एका पोस्टमध्ये विराट उद्धट माणूस असल्याचे म्हटले होते. ‘विराट कोहली हा फक्त जगातील सर्वोत्तम फलंदाज नाही, तर जगातील सर्वांत वाईट वर्तणूक करणारा खेळाडू आहे. त्याची क्रिकेटमधील क्षमता त्याच्या अहंकार आणि उद्धट व्यवहारासमोर फिकी पडते. तसं पाहिलं तर माझा देश सोडण्याचा कोणताही हेतू नाही, असा टोलाही त्यांनी या पोस्टमधून विराटला लगावला होता.

यानंतर अनेकांनी नसीरूद्दीन शाह यांना सोशल नेटवर्किंगवरुन ट्रोल केले होते. आता विराटने आयसीसी पुरस्कारांमध्ये तीन्ही महत्वाचे पुरस्कार जिंकल्यानंतर नेटकऱ्यांनी पुन्हा यावरुन शाह यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आयसीसीने दिलेले पुरस्कार हे विराटच किंग असल्याच्या दाखवतो असं सांगताना नेटकऱ्यांनी नसीरूद्दीन शाहांचे वेगवेगळे मिम्स ट्विटवरुन शेअर केले आहेत. पाहुयात असेच काही व्हायरल झालेले मिम्स…

विराट सगळे पुरस्कार जिंकल्याचे समजल्यानंतर नसीरूद्दीन शाह यांचा फोटो

गुनाह है यह

विराटला आयसीसीने पाच सन्मान दिल्यानंतर ते म्हणाले

विराटला मिळालेल्या पुरस्कारांची बातमी ऐकल्यावर

त्रास होतोय म्हणे…

आता क्रिकेट धोक्यात आहे म्हणतील

गंभीर रिअॅक्शन

या सर्व ट्विटवरुन असंच म्हणता येईल की विराटने हे पुरस्कार जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा नसीरूद्दीन शाह यांच्या विराटविरोधी वक्तव्याचा मिम्सच्या माध्यमातून पुन्हा समाचार घेतला आहे. दरम्यान आयसीसीच्या कसोटी आणि वन-डे संघाचंही कर्णधारपद विराट कोहलीलाच देण्यात आले आहे. २०१८ चा हंगाम खरोखरच विराटसाठी चांगला ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 3:27 pm

Web Title: naseeruddin shah trolled after virat kohli sweeps top 3 icc awards
Next Stories
1 प्रसिद्ध ‘बिकिनी हायकर’ ६५ फूटांवरून कोसळली, गारठून झाला मृत्यू
2 सेहवागच्या ‘त्या’ ट्विटवर लोकांनी दिली मजेदार उत्तरे
3 प्लास्टिकच्या बाटलीची चप्पल ऑनलाईन उपलब्ध; तीही १४०० रुपयांना
Just Now!
X