‘नॅशनल जिओग्राफिक’च्या मासिकावर झळकलेली ‘अफगाण गर्ल’ शारबत बीबीला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पाकिस्तानातून अटक करण्यात आली आहे. तपकिरी ओढणी अंगावर घेतलेली मोठ्या डोळ्याची शराबत ‘अफगाण गर्ल’ याच नावाने प्रसिद्ध झाली होती. १९८४ मध्ये पेशावरच्या एका निर्वासित छावण्यांमध्ये नॅशनल जिओग्राफिक मासिकाचे छायाचित्रकार स्टीव्ह मॅक्युरी यांनी तिचे छायाचित्र टीपले  होते. १९८५ मध्ये या मासिकाच्या अंकात शारबतचे छायाचित्र मुखपृष्ठावर होते. त्यानंतर ती जगभरात ‘अफगाण गर्ल’ या नावाने ओळखली जाऊ लागली होती.

परंतु आता तिला बनावट ओळखपत्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. ती मुळची अफगाणिस्तानची पण पाकिस्तानात स्थायिक झाली. तिच्याकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची ओळखपत्र आहेत, त्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. तिला आता १४ वर्षांचा तुरुंगवास आणि ३ हजार डॉलर पर्यंत दंड होऊ शकतो अशी माहिती पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तवाहिनीने दिली. १९८५ मध्ये नॅशनल जिओग्राफिकच्या मुखपृष्ठावर झळकल्यानंतर ती खूपच प्रसिद्ध झाली होती. इतक्या वर्षानंतर आजही या मासिकाच्या प्रसिद्ध छायाचित्रांच्या यादीत तिचे छायाचित्र अव्वल स्थानावर आहे. ती १२ वर्षांची असताना पेशावरच्या निर्वासित छावण्यांमध्ये स्टीव्ह यांनी तिचे छायाचित्र घेतले होते. त्यानंतर ही मुलगी कोण होती, कुठे गेली, कुठून आली याची कोणतीही माहिती समोर आली नाही.  जवळपास १७ वर्षांनंतर नॅशनल जिओग्राफिकने तिला शोधून काढले. तिच्यावर एक लघुपटही त्यांनी बनवला होता.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
Loksatta anvyarth A terrorist attack on Pakistan naval air base in Balochistan province
अन्वयार्थ: अनागोंदीचा आणखी एक पाकिस्तानी पैलू
raghav chadha british mp meeting
खलिस्तान समर्थकाच्या भेटीमुळे राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात