News Flash

National girl child day : जाणून घ्या का साजरा केला जातो ‘राष्ट्रीय कन्या दिन’

आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा

National girl child day : आज देशभरात राष्ट्रीय कन्य दिवस साजरा केला जातोय. तर जगभरात ११ ऑक्टोबर रोजी जागतिक कन्य दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी, शिक्षणाचा हक्क मिळावा, त्याची जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जातो.

समाजात मुलगा आणि मुलगी अशा होणाऱ्या भेदवाला कमी करण्यासाठी देशभरात राष्ट्रीय कन्य दिन साजरा केला जातो.  भारतातील काही शहरांत आणि गाव खेड्यात अद्यापही प्रत्येक क्षेत्रांमध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदभाक करण्यात येतो. शिक्षण, पोषण, आधिकार, चिकित्सा किंवा सन्मान या सर्वच ठिकाणी भेदवाव करण्यात येतो. मुलींना मुलापेक्षा कमी मानण्यात येते. हाच विचार बदलण्यासाठी आज गुरूवार देशभरात National girl child day साजरा करण्यात येतो.

मुलींना दिलेल्या वागणूकीत बदल करण्यात यावा यासाठी सरकारकडून अनेक कार्यक्रम राबवले जातात. मुलगी वाचवा ! देश घडवा ! यासारख्या घोषवाक्याचा वापर करत सरकार जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आज अनेक ठिकाणी मुलींना सन्मानाची वागणूक मिळत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून मुलींना सन्मान आणि समानतेची वागणूक मिळवूण देण्यासाठी अनेक योजाना आमंलात आणल्या आहेत. सरकारी योजनांमुळे लोकांमध्ये जागृती होत आहे. चूल आणि मुल अशी लोकांमध्ये असणारी भावना आता बदलली आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली आघाडीवर आहेत. कौटंबिक आणि सामाजिक गुन्हेगारीपासून मुलींना वाचवण्यासाठी सरकारकडून Domestic Violence Act 2009, Prohibition of Child Marriage Act 2006 and Dowry Prohibition Act 2006 कायदा तयार करण्यात आला. या कायद्यामुळे महिलांवर होण्यारा आत्याचार आणि हिंसा कमी झाली आहे.

आज आपल्या देशाच्या जडणघडणीत स्त्रियांचामोलाचा वाटा आहे पण भविष्यात तो पुरूषांच्या बरोबरीचा असणार आहे. भविष्यात आपलादेश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर मुली वाचायला हव्यात. मुलींची मुलांच्यातुलनेतील संख्या कशी वाढेल याकडे गांर्भियाने लक्ष दयायला हवे.

National girl child day साजरा करण्याचा उद्देश्य
– मुलींना समानतेचा हक्क मिळावा.
– समाजात मुलींना सन्मान मिळावा.
– मुलगा-मुलगी हा लिंगभेद कमी व्हावा.
– मुलींप्रति लोकांचा विचार बदलावा.
– प्रत्येक क्षेत्रात मुलींना सन्मान आणि संधी मिळावी.
– मुलींचे स्वास्थ, शिक्षण आणि पोषण याबाबत लोकांमध्ये जागृकता निर्माण व्हावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 10:41 am

Web Title: national girl child day 2019 how to celebrate national girl child day
Next Stories
1 ICC पुरस्कारांमध्ये विराट सर्वोत्तम ठरल्यानंतर नसीरुद्दीन शाह झाले ट्रोल, पाहा व्हायरल मिम्स
2 प्रसिद्ध ‘बिकिनी हायकर’ ६५ फूटांवरून कोसळली, गारठून झाला मृत्यू
3 सेहवागच्या ‘त्या’ ट्विटवर लोकांनी दिली मजेदार उत्तरे
Just Now!
X