आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७० वा वाढदिवस आहे. या वर्षी मोदींचा वाढदिवस हा ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं जाणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नवाटपाबरोबरच मास्क, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्याची तयारी भाजपाने केली आहे. याचबरोबर रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे. ७० ठीकाणी ७० कार्यक्रम करण्याचा निश्चय भाजपाने केला आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या विरोधकांनी मोदींचा वाढदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला सोशल नेटवर्किंगवर तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मोदींचा वाढदिवस सुरु झाल्यानंतर रात्री बारानंतर काही तासांमध्ये #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस तसेच #NationalUnemploymentDay हे हॅशटॅग भारतामध्ये ट्रेण्ड होऊ लागला आहे. या दोन्ही हॅशटॅगवर १० लाखांहून अधिक ट्विट करण्यात आलेत.

नक्की पाहा >> Birthday Special : एक लाखांचा पेन, सव्वा लाखांचे घड्याळ अन् गॉलची किंमत…; पाहा मोदींकडील वस्तूंच्या किंमती

करोनाच्या कालावधीमध्ये लाखो लोकांचे रोजगार गेले असून देशातील बेरोजगारांची संख्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यात मोदी सरकारने दिलेली आश्वासनांची आठवण करुन देत अनेकांनी #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस हा हॅशटॅग वापरुन मोदी सरकारला प्रश्न विचारले आहेत. भाषण नको रोजगार द्या, दाढी नाही रोजगार वाढवा, ते दोन कोटी रोजगार कुठे गेले ज्याबद्दल तुम्ही आश्वासन दिलेलं असे अनेक मुद्दे सोशल मीडियावर मांडण्यात आले आहेत. #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस  या हॅशटॅगवर अवघ्या काही तासांमध्ये दोन लाख २८ हजार ट्विट करण्यात आले आहेत. तर #NationalUnemploymentDay या हॅशटॅगवर ८ लाख ३७ हजार ट्विट करण्यात आले आहेत.

ट्विटवरुन यावरुन मिम्सचाही पाऊस पडला असून काहींनी मात्र गांभीर्याने प्रश्न विचारले आहेत. पाहुयात व्हायरल झालेले काही ट्विट…

१) ना चोर ना चौकीदार…

२) हा ट्रेण्ड वाढदिवसानिमित्तच…

३) आजचा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस

४) नोकऱ्या कुठे आहेत?

५) खासगीकरणावरुनही टोला

६) बुरे दिन

७) जेव्हापासून हे सरकार आलं आहे

८) रोजगार द्या

९) दाढी नाही…

१०) गाडीचं नाव बघा

११) उत्तर द्या…

१२) भाषण नको

एकीकडे #राष्ट्रीय_बेरोजगारी_दिवस ट्रेण्ड होत असतानाच दुसरीकडे #HappyBirthdayPMModi हा हॅशटॅगही ट्रेण्ड होताना दिसत आहे. त्याचबरोबरच Modi ji, #NarendraModiBirthday या हॅशटॅगचीही चर्चा आहे.