02 March 2021

News Flash

म्हशीसोबत मस्ती करताना हत्तीनं मारली लाथ; व्हिडीओ पाहून हसू होईल अनावर

लहान बाळाप्रमाणेच प्राण्यांमध्येही निरागसता असते

निरागसता जशी एखाद्या लहान मुलामध्ये दडलेली असते तशीच निरागसता प्राण्यांमध्येही पाहायला मिळते. जरी बोलता येत नसलं तरीदेखील हे प्राणी त्यांच्या कृतीतून एखाद्याविषयीचं प्रेम, आपुलकी, त्यांच्यातील अल्लडपणा दाखवत असतात. बऱ्याच वेळा सोशल मीडियावर प्राण्यांचे असे मजेशीर मस्ती करतानाचे व्हिडीओ व्हायरल होतही असतात. असाच एक मस्तीखोर हत्तीचा आणि म्हशीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीत उतरत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका जंगलात काही हत्ती आणि म्हशी उभ्या असल्याचं दिसून येत आहे. यात एक हत्ती मस्तीच्या मूडमध्ये येतो आणि तो एका म्हशीला सोंडेने धक्का मारतो. विशेष म्हणजे ही म्हैसदेखील त्याला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देते. ती सुद्धा त्याच आवेशाने त्याच्या दिशेने धावते आणि त्याला जोरात धक्का मारते. या दोघांच्या या मस्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ वनअधिकारी नंदा यांनी शेअर केला आहे.

“हत्ती मुळातच चंचल स्वभावाचे असतात. त्यामुळे ते कायम मस्ती करायच्या मूडमध्ये असतात. हाच त्यांचा स्वभाव इथे दिसून येत आहे. मस्तीमध्येच या हत्तीने म्हशीला मारलं, त्याला माहित होतं असं मुद्दाम केल्यावर काय होईल, तरीदेखील त्याने तिला मारलं”, असं कॅप्शन नंदा यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिआवर लोकप्रिय होत असून २४ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज त्याला मिळाले आहेत. तर २ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि ५०० पेक्षा जास्त रि-ट्विट करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2020 1:10 pm

Web Title: naughty elephant kicks the buffalo for fun see what happens next video goes viral ssj 93
Next Stories
1 “हिटलर दिसतोय मग चर्चिल का नाही?”; ब्रिटनचे माजी पंतप्रधान गुगलवरुन गायब
2 Video: ‘तुमची मुलं आम्हाला बघतायत’; दरोदारी जाऊन ‘पॉर्न स्टार्स’च देत आहेत पालकांना माहिती
3 ट्विटरवरील कव्हर फोटो आणि सुशांतच्या मृत्यूचं कनेक्शन?; आत्महत्येनंतर चर्चेत आलं ‘ते’ चित्र
Just Now!
X