नेपाळमधील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिनोद चौधरी यांच्या मुलांचा गेल्याच आठवड्यात विवाहसोहळा पार पडला. गेल्या वर्षभरात राजस्थानमध्ये पार पडलेला भव्य आणि डोळे दिपवणारा असा हा विवाहसोहळा असल्याचे म्हटले जाते. बिनोद चौधरी यांचा मुलगा वरुण हा शुक्रवारी अनुश्री टोंग्या हिच्याशी विवाहबंधनात अडकला. दोन दिवस चाललेला हा विवाह सोहळा राजास्थानमधल्या प्रसिद्ध जग मंदिर महालात पार पडला. हा सोहळा इतका थाटामाटात साजरा केला होता की वधू वरासाठी चांदीचा मंडप देखील बांधला होता. या विवाहसोहळ्यासाठी देशभरातून ३५ पंडितही आले होते. खास राजस्थानी परंपरेत या दोघांनीही लग्न केले.

या लग्नासाठी उदयपूरच्या आलिशान हॉटेल्समध्ये पाहुण्यांसाठी ७०० हून अधिक खोल्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे हॉटेल्सपासून लग्नमंडपापर्यंत पाहुण्यांची ने आण करण्यासाठी ५०० हून अधिक आलिशान गाड्या दिमतीला होत्या त्या वेगळ्याच. या लग्नसोहळ्यासाठी सलमान खानपासून शत्रुघ्न सिन्हा, बांगलादेशचे माजी राष्ट्रपती हुसैन मोहम्मद अरसद, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आदी मान्यवर देखील उपस्थित होते. बिनोद चौधरी यांच्या मोठ्या मुलाचे लग्न देखील राजस्थानमध्येच पार पडले होते. २०१५ मध्ये जयपूरमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. या विवाहसोहळ्याला देखील जगभरातल्या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

Bloodshed because of professional competition in Gondia Sand businessman killed in firing
गोंदियात व्यावसायिक स्पर्धेतून रक्तपात; गोळीबारात वाळू व्यावसायिकाचा मृत्यू
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
chess candidates 2024 nepomniachtchi beats vidit gujrathi
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेशची दुसऱ्या स्थानी घसरण’ विदितला नमवत नेपोम्नियाशी आघाडीवर; नाकामुराकडून प्रज्ञानंद पराभूत
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या

बिनोद चौधरी हे नेपाळमधले प्रसिद्ध व्यवसायिक आहेत.  २०१६ मध्ये फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत त्यांच्या नावाचाही सहभाग होता. त्यांच्याकडे जळपळपास ८४० कोटींची संपत्ती असल्याचे फोर्ब्स ने म्हटले आहे. विनोद चौधरी यांचे कुटुंब मुळचे राजस्थानचे पण व्यापाराच्या निमित्ताने ते कायमचे नेपाळमध्ये स्थायिक झाले. पण राजस्थानशी नाळ जोडल्याने आपल्या दोन्ही मुलांचा विवाह सोहळा त्यांनी राजस्थानमध्ये थाटामाटात साजरा पार पाडला.