28 September 2020

News Flash

‘मॅगी’ची आकर्षक ऑफर, रिकामी पाकिटं देऊन भरलेलं पाकिट घ्या

मॅगीची 10 रिकामी पाकिटं दुकानदाराला परत केलीत तर तुम्हाला मॅगीचं एक भरलेलं पाकिट अगदी मोफत मिळणार!

दोन मिनिटात तयार होऊन झटपट भूक भागवणाऱ्या मॅगीच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण नेस्ले इंडियाने ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर आणली आहे. नेस्लेने मॅगी नूडल्ससाठी विशेष ‘रिटर्न स्कीम’ सुरू केली आहे.

या ऑफरनुसार, आता तुम्ही मॅगीची 10 रिकामी पाकिटं दुकानदाराला परत केलीत तर तुम्हाला मॅगीचं एक भरलेलं पाकिट अगदी मोफत मिळणार आहे. सध्या देहरादून आणि मसूरीमध्ये ही स्कीम सुरू आहे. मात्र, लवकरच देशातील इतर राज्यांमध्ये ही स्कीम सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. देहरादून आणि मसूरीमध्ये कंपनीचे जवळपास 250 रिलेटर्स आहेत, या सर्व रिटेलर्सकडून ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.

प्रदूषणाचा धोका लक्षात घेत नेस्ले इंडियाने हे पाऊल उचलले आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच प्लास्टिकचा कचरा कमी होण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांमध्येही पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण होईल असा विश्वास नेस्ले इंडियानं व्यक्त केला आहे. तसंच, व्यापाऱ्यांचाही फायदा होईल असं कंपनीने म्हटलं आहे. तर, रिकाम्या पाकिटांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ‘इंडियन पोल्यूशन कंट्रोल असोसिएशन’ची असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 2:57 pm

Web Title: nestle india offer exchange 10 maggi empty packs for one fresh packet
Next Stories
1 लग्नानंतर 452 कोटींच्या आलिशान बंगल्यात राहणार इशा अंबानी
2 #DeepVeer : फोटोंसाठी आणखी किती प्रतीक्षा?; मीम्सद्वारे नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
3 80 दिवस इमानी श्वान करत होता मृत मालकीणीची प्रतीक्षा
Just Now!
X