सौदी अरेबियात आजवरच्या सर्वात व्यापक भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ११ राजपुत्र आणि डझनावारी आजी-माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली होती. अटक झालेल्यांमध्ये ट्विटर, अ‍ॅपल यासारख्या पाश्चात्य कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले अब्जाधीश राजपुत्र अल्वालीद बीन तलाल यांचाही समावेश आहे. ऐशोआरामात आयुष्य जगणाऱ्या अल्वालीद बीन तलाल यांचे मात्र अटकेनंतर ग्रह फिरले आहेत. कारण त्यांना गेल्या ४८ तासांत तब्बल ७८ अब्ज रूपये गमवावे लागले आहेत.

VIDEO : धुकं की धबधबा?, पाहा निसर्गाचा चक्रावून टाकणारा चमत्कार

त्यांच्या किंगडम होल्डिंग कंपनीचं बाजारमूल्य १९ बिलियन डॉलरने घटून १७.८ बिलियन डॉलर एवढं झालं आहे. केएचसीमध्ये अल्वालीद यांचे ९५ टक्के शेअर आहेत या कंपनीचे शेअर्स घटले आहे. गेल्या सहा वर्षांमधील सर्वात कमी दर या शेअर्सना मिळाले आहेत त्यामुळे प्रचंड मोठं नुकसान अल्वालीद बीन तलाल यांच्या कंपनीला झालं आहे.  अल्वालीद बीन तलाल हे सौदीमधल्या सर्वाधिक श्रीमंत व्यावसायिकापैंकी एक आहेत. अनेक विदेश कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. काही वृत्तपत्रांच्या माहितीनुसार कंपन्यांतल्या गुंतवणूकीव्यतिरिक्त खूप मोठी मालमत्ता त्यांच्या मालकीची आहे यात ४०० हून अधिक खोल्यांच्या रियाध पॅलेस, आलिशान बंगले, रिसॉर्ट, बोईंग विमान यांचाही समावेश आहे.

अटकेत असलेल्या सौदी प्रिन्सची ‘ती’ राजकन्या मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत