भारतामध्ये आज मोठ्या उत्साहात ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. अनेक ठिकाणी झेंडावंदन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खऱ्याखुऱ्या उत्साहाबरोबरच सोशल नेटवर्किंगवरही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पहायला मिळत आहे. काल रात्रीपासूनच ट्विटवर #IndependenceDayIndia हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसला. याशिवाय आणखीन एक मजेदार हॅसटॅग ट्रेण्ड होताना दिसला. तो हॅशटॅग म्हणजे #AbbuKoWishNahiKaroge.

भारतीय नेटकऱ्यांनी पाकिस्तानला ट्रोल करत त्यांना ‘बापाला शुभेच्छा नाही देणार का?’ असा सवाल पाकिस्तानी नेटकऱ्यांना केला आहे. #AbbuKoWishNahiKaroge हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी मिम्स शेअर केले आहे. केंद्रातील मोदी सरकारने कलम ३७० रद्द करत जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून टाकल्यानंतर पाकिस्तानने याबद्दल संताप व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्करातील मेजर जनरल आणि मीडिया विंग इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन (आईएसपीआर) चे महानिदेशक आसिफ गफूर यांनी १४ ऑगस्टच्या रात्री १० वाजता एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनाला काळा दिवस म्हणत पुढील १५० मिनिटांमध्ये तो सुरु होईल असं म्हटलं होतं.

गफूर यांच्या या ट्विटला उत्तर देताना भारताचे निवृत्त लष्करी अधिकारी मेजर गौरव आर्या यांनी #AbbuKoWishNahiKaroge हा हॅशटॅग वापरुन गफूर यांचे ट्विट करत बापाला शुभेच्छा नाही देणार का असा सवाल केला.

त्यानंतर भारतीयांनी #AbbuKoWishNahiKaroge हा हॅशटॅग वापरुन पाकिस्तानला चांगलेच सुनावले. भारतीयांनी पाकिस्तानला लक्ष्य केलं असून अनेकांनी आजच्या स्वातंत्र्य दिनी त्यांच्यावर मिम्सच्या माध्यमातून पाकिस्तानची फिरकी घेतली आहे. पाहुयात असेच काही व्हायरल झालेले मिम्स…

बाबांना शुभेच्छा द्या

आणि अचानक

इम्रान खान सभेतही म्हणाले

काल भारताने मुलाला शुभेच्छा दिल्या आज मुलाने बापाला द्यायला हव्यात

आता ट्विटवरुन लढणार

माझे बाबा आहेत ते

दरम्यान, काल पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी बलुचिस्तान समर्थकांनी सोशल नेटवर्किंगवर काळा दिवस म्हणून साजरा केला. त्याच पार्श्वभूमीवर गफूर यांनी भारतावर टीका करण्याचा प्रयत्न केला पण तो डाव त्यांच्यावर उलटा पडल्याचे दिसत आहे.