News Flash

1322 कोटींची लॉटरी जिंकताच पतीला सोडून चोराशी केलं लग्न !

माजी पतीसोबत 1322 कोटी रुपयांची लॉटरी जिंकणाऱ्या महिलेने एका चोरासोबत लग्न केलं आहे.

(गिलियन बेफोर्ड आणि तिचा माजी पती यांचा लॉटरी जिंकल्यानंतरचं छायाचित्र, फोटो- Getty Images)

माजी पतीसोबत 1322 कोटी रुपयांची लॉटरी जिंकणाऱ्या महिलेने स्कॉटलंडमधील फिफे येथे दुसरं लग्न केलं आहे. युरोमिलियन या प्रसिद्ध लॉटरीमध्ये कोट्यवधी रुपये जिंकल्याच्या अवघ्या 15 महिन्यांनंतरच गिलियन बेफोर्ड(वय 46) या महिलेचा पती एड्रियन याच्यासोबत घटस्फोट झाला. विशेष म्हणजे गिलियन हिने ज्या व्यक्तीशी नव्याने संसार थाटला त्याच्यावर चोरीचा आरोप असून त्यासाठी त्याला 6 महिन्यांचा तुरूंगवासही झाला आहे.

द सनने दिलेल्या वृत्तानुसार, गिलियन हिने ब्रायन डिन्स याच्यासोबत लग्न केलं आहे. गिलियनपेक्षा ब्रायन 9 वर्षांनी लहान आहे. जवळपास 12 लाख रुपयांची अफरातफरी केल्याप्रकरणाी त्याला शिक्षा झाली होती. ब्रायन डिन्स हा एका बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. गिलियनसोबत रिलेशनमध्ये आल्यानंतर मी माझ्या गुन्ह्याबाबत तिला सर्व काही सांगितलं होतं असं ब्रायन म्हणाला. तर, ती ६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यासाठी ब्रायनला कायमस्वरुपी शिक्षा होऊ शकत नाही असं गिलियन म्हणाली. मला त्याच्या गुन्ह्याबाबत सुरूवातीपासूच माहिती आहे, आणि त्यामध्ये मला काहीही चुकीचं वाटत नाही असं दोन मुलाची आई असलेल्या गिलियनने सांगितलं.

दरम्यान, लॉटरी जिंकल्यानंतर गिलियनबाबत चर्चा रंगली होती आणि आता दुसऱ्या लग्नामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:58 pm

Web Title: new husband of lottery winner who ended her previous marriage 15 months after 148million euromillions haul is a convicted conman who stole 13000 from tesco
Next Stories
1 उद्यापासून JioPhone 2 चा फ्लॅशसेल सुरू, कशी करायची नोंदणी?
2 #IndependenceDayIndia : ‘स्वातंत्र्य दिना’निमित्त ट्विटर इंडियाचा मराठीतूनही हॅशटॅग
3 पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा देणाऱ्या ट्विटरकराला सानिया मिर्झाचं सडेतोड उत्तर
Just Now!
X