News Flash

व्हॉट्सअ‍ॅपवर आला New Year Virus !

लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर नव्या वर्षामध्ये एका नव्या व्हायरसद्वारे हल्ला...

लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वर नव्या वर्षामध्ये एका नव्या व्हायरसद्वारे हल्ला केला जात असल्याचं समोर आलं आहे. New Year Virus नावाने एक नवा व्हायरस अ‍ॅक्टिव्ह झाला असून याद्वारे स्मार्टफोन्सना लक्ष्य केले जात आहे.

हा व्हायरस म्हणजे युजरच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज पाठवला जातो, या मेसेजमध्ये एखाद्या वेबपेजची लिंक दिली जाते. काही आकर्षक ऑफर्सद्वारे या लिंकवर क्लिक करण्यासाठी हॅकर्सकडून प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न असतो. मेसेजमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करताच स्मार्टफोन किंवा संगणक हॅक होण्याची शक्यता बळावते. याशिवाय हे व्हायरसचे मेसेज अनेक जाहिरातींद्वारेही पाठवले जातात. यामध्ये काही खोट्या सेवांना सबस्क्राइब करण्यास सांगितले जाते.

अशाप्रकारचे मेसेज म्हणजे एक धोकादायक स्कॅम आहे. जर अशाप्रकारचा मेसेज आला तर त्यावर क्लिक करु नये हा यावरील सर्वोत्तम उपाय. तसंच, मेसेज पाठवणाऱ्याला ब्लॉक करावं. कारण, तुम्ही एकदा त्या लिंकवर केले तर तुमची खासगी माहिती चोरी, बँक खात्याची माहिती इत्यादी अनेक बाबी चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर येणारा प्रत्येक मेसेज नीट वाचा, तो फेक मेसेज तर नाहीयेना याची खात्री करा आणि नंतरच त्यावरील लिंकवर क्लिक करा.

आणखी वाचा : (चॅटिंग बदलणार ! WhatsApp मध्ये येतंय सर्वात ‘ढासू’ फीचर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 11:53 am

Web Title: new year virus spreading on whatsapp sas 89
Next Stories
1 Video: नवरीचे बहिणीच्या नवऱ्याशी संबंध; नवरदेवाने लग्नातच दाखवला अश्लील व्हिडीओ
2 Viral Video : दारु पिऊन तरुणाने मारल्या नागाशी गप्पा
3 Video : गरोदर स्त्रीसाठी नवराच झाला खुर्ची!
Just Now!
X