23 November 2017

News Flash

धावता-धावता ‘तो’ प्रेमात पडला!, कृष्णवर्णीय मैत्रिणीला घातली लग्नाची मागणी

जेकचं हे अनोख प्रपोजल सोशल मीडियावर व्हायरल झालंय

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 12, 2017 11:14 AM

उत्तर इंग्लडमध्ये नुकतीच 'ग्रेट नॉर्थ रेस' स्पर्धा पार पडली या स्पर्धेत जेक उपविजेता ठरला.

मॅकडेलन मसाई केनियामधल्या कुटुंबात जन्मलेली सर्वसामान्य मुलगी. कृष्णवर्णीय असल्यानं तिच्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टीकोन थोडा वेगळा होता. पण, आता ती सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे. कारण इंग्लंडमध्ये पार पडलेल्या धावण्याच्या स्पर्धेत तिला तिच्या स्वप्नाचा राजकुमार भेटला. न्यूझीलंडचा धावपटू जेक रॉबर्टसननं स्पर्धा जिंकल्यानंतर सर्वासमोर तिला लग्नाची मागणी घातली.

वाचा : अधुरी एक कहानी!; लग्नाच्या दोन आठवड्यांपूर्वीच तिचा मृत्यू झाला

उत्तर इंग्लंडमध्ये नुकतीच ‘ग्रेट नॉर्थ रेस’ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत जेक उपविजेता ठरला. स्पर्धा संपल्यानंतर त्याने आपली मैत्रीण मॅकडेलनला फिनिशिंग लाईनजवळ भेटायला सांगितलं होतं. या स्पर्धेत जेक उपविजेता ठरला. त्याने जशी फिनिशिंग लाईन पार केली, तसा तो आपल्या गुडघ्यावर बसला आणि फिनिशिंग लाईनजवळ त्याची वाट पाहत उभ्या असलेल्या मॅकडेलनला त्याने लग्नाची मागणी घातली.
स्पर्धेत पहिल्या आलेल्या खेळाडूसाठीही इतक्या टाळ्यांचा कटकडाट झाला नसेल तेवढा मॅकडेलननं होकार दिल्यावर झाला. या जोडीवर मैदानातच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. तिथे असलेल्या माध्यमांनी हे क्षण कॅमेरात कैद केलेत. जेकचं हे अनोख प्रपोजल सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

First Published on September 12, 2017 11:03 am

Web Title: new zealand athlete proposed his girlfriend at the finishing line