दरवाजाची बेल वाजते. दरवाजा उघडल्यावर समोर नग्न अवस्थेत एक पुरुष आणि स्त्री उभी असते. ते दोघे दरवाजा उघडणाऱ्या व्यक्तीला ‘तुमची मुलं आम्हाला बघतायत’ असं सांगतात. बरं हे सांगणारे व्यक्ती पॉर्न स्टार्स असतात असं जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलं आहे. सध्या सोशल नेटवर्किंगवर या जाहिरातीची प्रचंड चर्चा आहे. विशेष म्हणजे इंटरनेट सुरक्षा या विषयावरील ही जाहिरात चक्क सरकारी मोहिमेसाठी तयार करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द गार्डीयन’ने दिलं आहे.

२०१९ मध्ये समोर आलेल्या एका अहवालानुसार न्यूझीलंडमध्ये पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच गोष्टीला आळा घालण्यासाठी आता सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यासाठी सरकारने एक वेबसाईट तयार केली असून त्यामाध्यमातून जागृती केली जात आहे. मात्र या वेबसाईटची जाहिरात करण्यासाठी सरकारने अगदी भन्नाट कल्पना वापरली आहे. सरकारने सुरु केलेल्या वेबसाईटची जाहिरात करण्याचे कंत्राट मोशन सिकनेस या जाहिरात कंपनीला दिलं आहे. सध्या या जाहिराती नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्याचे दिसून येत आहे. मागील दीड आठवड्यांमध्ये या जाहिरातींना ९ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

chatting with scammer viral photo
“मित्रा, तू अजिबात अशा लिंक डाउनलोड करू नको!” खुद्द Scammer ने दिला हिताचा सल्ला; पाहा व्हायरल चॅट्स
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
why Tata and Wipro want to buy Aachi Masala food company
Tata and Wipro : टाटा – विप्रो कंपनीला आची मसाला कंपनी २००० कोटी रुपयांना का खरेदी करायची आहे?

काय आहे जाहिरातीमध्ये

दाराची बेल वाजल्यानंतर समोर उभे असणारे पॉर्न स्टार्स दरवाजा उघडणाऱ्या महिलेला तुमचा मुलगा आम्हाला पाहतोय हे सांगण्यासाठी आम्ही आलो आहोत असं सांगतात. त्यावेळी आई दारातून मुलाला हाक मारुन बोलावते. दरम्यानच्या काळात सुरु असणाऱ्या संवादामध्ये पॉर्न स्टार्स आम्ही देत असलेली सेवा ही सज्ञानांसाठी आहे. तुमचा मुलगा त्याचा गैरफायदा घेत त्या माध्यमातून सेक्स संदर्भात माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे, असं सांगतात. त्यावेळी आई तो तुम्हाला कुठे पाहतो असं विचारते. यावर हे पॉर्न स्टार्स मोबाइल, लॅपटॉप, तुमचा मोबाईल, तुम्ही घरी नसताना स्मार्ट टिव्ही असं उत्तर देतात. पुढे बोलताना हे पॉर्न स्टार्स नाती खरोखर काम करतात. आम्ही येथे एकमेकांच्या संमतीशिवाय हे सर्व करतो असं सांगतात. या गप्पा सुरु असतानाच मुलगा हातात लॅपटॉप घेऊन बाहेर येतो आणि त्याला धक्काच बसतो. त्यानंतर आईच या मुलाला आपण या म्हणजेच सेक्स या विषयावर बोललं पाहिजे असं सांगत त्याच्याशी चर्चा करु लागते असं जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलं आहे.

याच कंपनीने सायबर बुलिंगसंदर्भातही एक जाहिरात केली असून नावावरुन चिडवणे किंवा एखाद्याला टार्गेट केल्याने त्याच्यावर परिणाम होऊ शकतो हे या जाहिरातीमधून सांगण्यात आलं आहे. सायबर बुलिंगसारखे प्रकार थांबवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे या जाहिरातीमधून दाखवण्यात आलं आहे.

“या विषयाबद्दल बोलताना पालकांना आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या मुलांना त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेणारं दुसरं कोणी नसतं,” असं मोशन सिकनेसच्या प्रवक्त्या हिलरी की यांनी म्हटलं आहे.