22 February 2019

News Flash

बापरे!! दारूच्या नशेत चक्क हॉटेलच विकत घेतलं

दारूच्या नशेत दोघांनी संपूर्ण व्यवहार पारही पाडले.

गिना लाऑन्स आणि मार्क ली हे जोडपं गेल्यावर्षी हनिमुनसाठी श्रीलंकेला गेले. मात्र मद्याच्या अंमलाखाली असलेल्या या दोघांनी नशेत चक्क हॉटेल खरेदीचा व्यवहार करून टाकला. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा आपण जवळपास २९ लाखांहून अधिक रुपयांचा व्यवहार केल्याचं त्यांच्या लक्षात आलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

दारूच्या नशेत हॉटेल खरेदी करुन या व्यवसायात उतरलेल्या गिना आणि मार्कची ही भन्नाट जोडी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. डिसेंबर महिन्यात गिना आणि मार्क हे दोघंही हनिमुनसाठी श्रीलंकेतल्या समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलमध्ये थांबले. हे हॉटेल एका व्यावसायिकानं भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलं होतं, मात्र त्याची मुदत संपत आली असल्याचं गिना आणि मार्कला कळलं. हॉटेल परिसरात मद्यपान करत असलेल्या या जोडप्यानं दारूच्या नशेत हॉटेल मालकाकडे हॉटेल विकत घेण्याचा मानस बोलून दाखवला.

या छोट्याश्या हॉटेलची किंमत २९ लाखांच्या आसपास असल्याचं त्यांना समजलं. मग काय, दारूच्या नशेत दोघांनी संपूर्ण व्यवहार पारही पाडले. मात्र शुद्धीवर आल्यानंतर आपण काय केलं याची जाणीव दोघांना झाली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. अखेर पदरी पडलं पवित्र झालं म्हणत या दोघांनी कोणताही अनुभव नसताना हे हॉटेल चालवायला घेतलं. मुळचे लंडनमधले गिना आणि मार्क हे दोघंही आता गेल्या काही महिन्यांपासून हे हॉटेल चालवत आहेत.

First Published on October 11, 2018 6:35 pm

Web Title: newlyweds get drunk end up buying a hotel in sri lanka