15 October 2019

News Flash

IPL 2019 : नीता अंबानींचा मंत्रजप, सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया

'इतका तणाव होता की शेवटचा चेंडू मी पाहिलासुद्धा नाही,' अशी प्रतिक्रिया नीता अंबानी यांनी दिली.

अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर एका धावेने मात करून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अखेरच्या चेंडूवर चेन्नईला दोन धावांची गरज होती. यावेळी मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी तणावग्रस्त दिसत होत्या. अखेरच्या षटकावेळी त्या हात जोडून मंत्रजाप करत होत्या. त्यांचा हा व्हिडिओ सामना संपल्यानंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनीही भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विश्वचषकासाठीसुद्धा तुम्ही भारतीय क्रिकेट संघासोबत राहा, असा सल्लाच एका युजरने त्यांना दिला. तर अनेकांनी तुम्ही नक्की कोणता मंत्रजप करत आहात असा प्रश्न विचारला.

अखेरच्या मलिंगाच्या यॉर्कर चेंडूवर शार्दूल ठाकूर पायचीत झाला आणि मुंबईने एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला. त्यामुळे यात नीता अंबानींच्या मंत्रजपाचाही फायदा झाला असं नेटकऱ्यांनी म्हटलं.

सामना जिंकण्याबाबत इतका तणाव होता की शेवटचं षटक मी पाहिलंसुद्धा नाही, अशी प्रतिक्रिया नीता अंबानींनी दिली. ‘स्टेडियमवर उपस्थित असलेल्या लोकांच्या आवाजावरून मी अंदाज बांधत होती,’ असं त्यांनी म्हटलं.

First Published on May 13, 2019 1:05 pm

Web Title: nita ambani mantra for the mumbai indians got hilarious twitter reactions
टॅग IPL 2019