सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. कारण, या व्हिडिओत तुम्हाला मृत्यू अगदी जवळून पाहायला मिळेल. या घटनेनंतर या व्हिडिओत दिसणारा तरुण जागीच मरण पावला आहे.

तेलंगणामधली ही घटना आहे. दोन व्यक्ती बाईकवरुन चालल्या आहेत. समोर चेकपोस्ट आहे. रस्त्यावर लोखंडी बार आडवा लावला आहे. ह्या दोन व्यक्ती आपल्या बाईकवरुन वेगानं येत आहेत. इकडून पोलिस ओरडून, इशारे करुन सांगत आहेत. थांबा, थांबा…मात्र तुफान वेगात असलेले हे तरुण ऐकायलाच तयार नाहीत. पोलिस शक्य तितक्या वेगाने हालचाली करत तो लोखंडी बार बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहे.मात्र, त्याआधीच…..ही गाडी बारजवळ आली. गाडी चालवणारा व्यक्ती खाली झुकला. पण मागे बसणारा व्यक्ती मात्र खाली वाकायच्या आधीच त्या बारवर जोरात आदळला, गाडीवरुन खाली पडला आणि जागीच ठार झाला.

२२ मे रोजी तेलंगणातल्या जन्नाराम जिल्ह्यातल्या तपलपूर गावातली ही घटना आहे. हा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे आणि तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की या दोघांनी गाडी थांबवली तर नाहीच पण गाडीचा वेगही कमी केला नाही. या चेकपोस्टवरचा पोलीस कर्मचारी सातत्याने त्यांना इशारा करत थांबण्यास सांगत होता, मात्र या दोघांनीही त्याचं ऐकलं नाही आणि त्यामुळे मागे बसलेल्या त्या तरुणाचा जीव गेला. गाडी चालवणारी व्यक्ती मात्र तशीच पुढे पळून गेली.

या मृतांच्या पालकांनी सदर घटनेसाठी पोलिसांना जबाबदार धरलं. त्यानंतप आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत पोलीस अधिकारी अखिल महाजन म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून ते चेकपोस्ट तिथेच आहे. गाडी चालवणारी व्यक्ती बेफाम गाडी चालवत होता, त्याने पोलिसांकडे लक्षही दिलं नाही. स्वतः मात्र वेळेवर खाली वाकला, मात्र मागच्या व्यक्तीला वेळेत खाली वाकता आलं नाही. पळून गेलेल्या या व्यक्तीला साधारण एका तासांनंतर अटक कऱण्यात आली, त्यावेळी हे लक्षात आलं की त्याने खूप दारु पिली होती. त्यामुळे ह्या घटनेमध्ये पोलिसांचा काहीही दोष नाही. बऱ्याच लोकांनाही असंच वाटतं हे पाहून बरं वाटत आहे.
गाडी चालवणाऱ्या व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.