भाजपाध्यक्ष अमित शाह गुरुवारी इंडिया टीव्हीचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘आप की अदालत’ कार्यक्रमात सहभागी झाले. मात्र एका गोष्टीने यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं जो चर्चेचा विषय ठरला. ‘आप की अदालत’ मध्ये न्यायालयाप्रमाणे न्यायाधीश बसवलेले असतात. तसं पाहता त्यांची भूमिका काही नसते पण कार्यक्रमाची रुपरेषाच तशी आहे. पण अमित शाह आले असता यावेळी न्यायाधीशच नव्हते. यानंतर सोशल मीडियावर अमित शाह यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली.

अमित शाह यांनी रजत शर्मा यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना विरोधकांवरही जोरदार टीका केली. अमित शाह यांनी अखिलेश यादव यांच्यापासून ते कपिल सिब्बल आणि अन्य नेत्यांवरही हल्लाबोल केला. कपिल सिब्बल यांनी दहशतवाद्यांचे मृतदेह दाखवण्याची केलेल्या मागणीवर बोलताना अमित शाह यांनी त्यांनी बालाकोटला गेलं पाहिजे असं म्हटलं आहे. निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलताना अमित शाह यांनी देशाची सुरक्षा हा मुख्य मुद्दा असला पाहिजे असं सांगितलं. देशाची सुरक्षा कोण करणार हे लोकांना जाणून घ्यायचं आहे असंही ते म्हणाले.

प्रसिद्ध कॉमेडिअन कुणाल कामरा यांनी कार्यक्रमातील स्क्रीनशॉट पोस्ट करत लिहिलं आहे की, अमित शाह आले असल्या कारणाने हा पहिलाच एपिसोड पाहत आहे ज्यामध्ये न्यायाधीशच नाही.

 

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आले होते तेव्हाही न्यायाधीश नव्हते. न्यायाधीश उपस्थित नसणे कार्यक्रमाचा भाग होता, पण तरीही सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.