07 July 2020

News Flash

कौतुकास्पद…१२ वर्षाच्या मुलीनं साठवलेल्या पैशातून तीन मजुरांना विमानानं पोहोचवलं घरी

"बातम्या बघताना मजुरांना होणारा त्रास पाहून ती दुःखी व्हायची, एक दिवस तिने...

करोना व्हायरस लॉकडाउनमुळे स्वतःच्या मूळ गावी परतणाऱ्या लाखो मजुरांचे हाल होतायेत. पण या काळात अनेक असे लोकंही समोर आलेत ज्यांनी स्वतःच्या खर्चाने मजुरांना घरी पोहोचवण्याचं काम केलं. असंच कौतुकास्पद काम केलंय नोएडाच्या एका १२ वर्षांच्या मुलीने. निहारिका दि्वेदी नावाच्या या मुलीने आपल्या साठवलेल्या पैशांतून तीन मजुरांना त्यांच्या घरी पाठवलंय. तेही थेट विमानाने.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, निहारिका आठवीची विद्यार्थीनी आहे. तिने बचत केलेले जवळपास ४८ हजार रुपये दान केले असून त्याद्वारे तीन मजुरांना विमानाने झारखंडमध्ये त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली. त्या तीन प्रवाशांपैकी एक कर्करोगाने ग्रस्त असल्याची माहिती आहे.

“बातम्या बघताना मजुरांना होणारा त्रास पाहून ती दुःखी व्हायची…एक दिवस तिने आपण या लोकांना विमानाने पाठवू शकतो का असं विचारलं…त्यानंतर साठवलेले पैसे तिने आम्हाला दिले आणि मला त्या मजुरांची मदत करायची आहे असं म्हटलं. आपल्या मुलीचं ते म्हणणं ऐकून खूप आनंद झाला. आम्हाला आमच्या एका मित्राकडून तीन मजुरांना झारखंडला जायचं असल्याची माहिती मिळाली. त्यांच्यातील एक कर्करोगग्रस्त असल्याचंही समजलं. त्यामुळे आम्ही त्यांच्या तिकीटाची व्यवस्था केली”, अशी प्रतिक्रिया निहारिकाची आई सुरभी यांनी दिली. तर, “समाजाने आपल्याला बरंच काही दिलं आहे, आणि आता या अडचणीच्या काळात समाजासाठी काहीतरी करावं ही आपली जबाबदारी आहे”, असं निहारिका म्हणाली. निहारिकाच्या या कामाचं सोशल मीडियामध्ये भरभरून कौतुक केलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 9:17 am

Web Title: noida 12 year old girl spends savings of rs 48000 to book flight tickets for migrants sas 89
टॅग Coronavirus
Next Stories
1 युवराज माफी माग… नेटकऱ्यांनी का केली मागणी?
2 मराठी पाऊल पडते पुढे ! KBC मध्ये पहिले करोडपती ठरलेला हर्षवर्धन नवाथे गाजवतोय कॉर्पोरेट क्षेत्र
3 मोठ्या मनाच्या आजीबाई ! ६०० रुपयांच्या पेन्शनमधील ५०० रुपये गरजूंच्या मदतीसाठी केले दान
Just Now!
X