02 March 2021

News Flash

अजब प्रेम की गजब कहानी! कराटे चॅम्पियन पत्नीने तोडला पतीचा पाय

पोलिसांना बोलावून 'माझ्या पत्नीपासून मला वाचवा', अशी विनवणी

सोशल मीड‍ियावर एक व्यक्ती कराटे चॅम्पियन मुलीच्या प्रेमात पडला, नंतर तिच्याशीच लग्न केलं. पण तेव्हापासून त्या व्यक्तीच्या आयुष्यात जणू काही भूकंपच झाला. पती-पत्नीमध्ये कधीही भांडण झालं तर पत्नी आपलं कराटेचं ‘टॅलेंट’ नवऱ्यावरच वापरायची. शनिवारीही दोघांमध्ये भांडण झालं, पण हे भांडण नवऱ्याला चांगलंच महागात पडलं. कारण, पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा पाय फ्रॅक्चर झाला. दुसऱ्या दिवशी व्हिल चेअरवर पीडित पती रुग्णालयात पोहोचला आणि पोलिसांना बोलावून ‘माझ्या पत्नीपासून मला वाचवा’, अशी विनवणी त्याने केली. ही विचित्र घटना घडलीये द‍िल्ली-एनसीआरच्या नोएडामध्ये.

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर-19मध्ये राहणाऱ्या दीपक साहनी यांची जवळपास दीड वर्षापूर्वी सोशल मीडियावर एका तरुणीसोबत ओळख झाली. चॅटिंग वाढत गेली आणि नंतर प्रेमात रुपांतर झालं. दोघांनी लग्नही केलं. पण कराटे चॅम्पियन पत्नीने आपल्यातील कराटेचे टॅलेंट अनेकदा पतीवरच वापरले. पीडित दीपकने सांगितल्यानुसार, लग्नानंतर दोघांमध्ये छोटी-मोठी भाडणं व्हायला सुरूवात झाली. भांडण झाल्यावर ती नेहमी मारहाण करायची, असं दीपक यांनी सांगितलं. शनिवारी रात्री कराटेचा सराव करण्यासाठी पत्नीने दीपकला बोलावलं आणि जोरदार किक मारुन त्याचा पाय तोडला. रात्रभर पती तिथेच विव्हळत होता, रविवारी अन्य नातेवाईक आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लग्नानंतर तरुणीला कराटेच्या सरावासाठी जायला जमत नव्हते. त्यामुळे ती पतीच्या सांगण्यानुसार घरातच सराव करत होती, अशी माहिती आहे.

दरम्यान, तरुणाच्या वडिलांनी म्हणजे अशोक साहनी यांनी सुनेवर मारहाणीचा आरोप केला आहे. सून नेहमी माझ्या मुलाला मारहाण करते, असा आरोप साहनी यांनी केला आहे. यापूर्वी पत्नीने केलेल्या मारहाणीत आपल्या मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर पोलिसांकडे तक्रारही केली होती, असे अशोक साहनी यांनी सांगितले. मे २०१९ रोजी दोघांचा विवाह झाला होता. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2020 4:53 pm

Web Title: noidakarate champion wife beaten husband and broke his leg sas 89
Next Stories
1 पाकिस्तानच्या महिला मंत्रीच इम्रान खान यांच्यावर फिदा, म्हणाल्या….
2 viral memes : दूरदर्शनचा भाव वाढला; हे पहा भन्नाट मीम्स
3 नवव्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतरही महिला उठून चालू लागली, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण
Just Now!
X