Nokia ने भारतात स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये पदार्पण केलंय. कंपनीने 55 इंच आकाराचा 4K स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. या टीव्हीच्या विक्रीसाठी कंपनीने ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टसोबत भागीदारी केलीये. 10 डिसेंबरपासून या टीव्हीच्या विक्रीला सुरूवात होईल. 41,999 रुपये इतकी या टीव्हीची किंमत आहे. फ्लिपकार्टवर या टीव्हीच्या खरेदीवर 10 टक्के डिस्काउंटची ऑफर, याशिवाय नो-कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील असेल.

फीचर्स –
हा स्मार्ट टीव्ही ‘अँड्रॉइड 9 पाय’वर आधारित अँड्रॉइड टीव्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असेल. यामध्ये गुगल प्ले-स्टोरदेखील असेल, ज्याद्वारे युजर्स आपले आवडीचे अॅप्स डाउनलोड करु शकतात. या 4K टीव्हीमध्ये PureX क्वॉड-कोर प्रोसेसर आणि 2.25जीबी रॅम आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये इंटेलिजेंट डिमिंग टेक्नॉलजी, डॉल्बी व्हिजन आणि HDR 10 यांसारखे फीचर्स आहेत.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

साउंड क्वालिटीचा विचार करुन यामध्ये कंपनीने JBL च्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. 55 इंचाच्या Ultra HD डिस्प्ले असलेल्या या टीव्हीला बेजल-लेस डिझाइन असून डिस्प्ले रिझोल्युशन 3840 x 2160 पिक्सल आहे. यामध्ये Netflix आणि YouTube साठी गुगल व्हॉइस असिस्टंटची सेवाही आहे. या टीव्हीत क्लिअर व्ह्यू टेक्नोलॉजी आणि क्लिअर साउंड टेक्नोलॉजीचा सपोर्टही आहे. नोकियाच्या या टीव्हीद्वारे शाओमी, मोटोरोला, Vu, थॉमसन यांसारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.