News Flash

तरुणाईला आकर्षित करणारी ‘मड जीन्स’ बाजारात, किंमत पाहून व्हाल थक्क!

प्रसिद्ध जिन्स पँटच्या ब्रँडने चक्क मळक्या जीन्स बाजारात आणल्या आहेत

फॅशनविश्वात कधी कोणती फॅशन येईल काही सांगता येत नाही. बघा ना, पूर्वी पँट उसवली किंवा फाटली की असे फाटलेले कपडे घालून फिरताना किती लाज वाटायची आणि वाईटही वाटायचं पण हल्ली ठिकठिकाणी फाटलेल्या आणि ठिगळ लावलेल्या जिन्स घालून फिरण्याची फॅशन आली आहे. एवढंच कशाला अशा जिन्स विकत घेण्यासाठी आपण दोन एक हजार रुपये तर सहज मोजतो. पण हा झाला फाटक्या जीन्सचा ट्रेंड. पण हे फॅशनविश्व आहे. इथे नेहमीच ट्रेंड बदलत असतात, तेव्हा फॅशन विश्वात कधी कोणता ट्रेंड येईल याची कल्पनाच आपण करु शकत नाही. आता हेच बघा ना एका प्रसिद्ध जिन्स पँटच्या ब्रँडने चक्क मळक्या जीन्स बाजारात आणल्या आहेत ज्याची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा आहे.

नॉर्डस्ट्रोम या जीन्स ब्रँडने चिखलाने बरबटलेल्या मळक्या जीन्स बाजारात विक्रीसाठी आणल्यात. बरं आता या जीन्स चिखलाने माखलेल्या आणि खराब असतील म्हणून स्वस्तात बाजारात उपलब्ध असतील असं जर तुमचं मत असेल तर तुमचा मोठा गैरसमज आहे. कारण या जीन्स पँट विकत घ्यायच्या झाल्याच तर तुम्हाला जवळपास २९ हजार रुपये मोजावे लागणार आहे. काय बसला ना धक्का? पण हे खरंय म्हणूनच तर सोशल मीडियावर या जीन्सची सर्वाधिक चर्चा आहे. आता या मळलेल्या जीन्स धुवायच्या की अशाच वापरायच्या असा प्रश्न नेटिझन्सना पडलाय. चिखलात माखलेल्याच नाही तर रंग उडालेल्या आणि ठिकठिकाणी ठिगळ लावलेल्या जीन्स ही विक्रीसाठी आल्या आहेत. तेव्हा या नव्या ट्रेंडमुळे तरूणांना फॅशन करण्यासाठी जरा हटके स्टाईल आणि चर्चा करण्यासाठी नवा विषय मिळाला हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 6:07 pm

Web Title: nordstrom mud jeans mppg 94
Next Stories
1 ‘अलिबाबा’प्रमाणे वर्चस्वाची अंबानींची तयारी, 1.6 लाख कोटींची योजना तयार
2 गांगुलीबाबत 12 वर्षांपूर्वी केलेली एक भविष्यवाणी खरी, अजून एक बाकी : सेहवाग
3 दारुडा पती जुगारात बायको हरला, नंतर…
Just Now!
X