22 April 2019

News Flash

पेटीएमवरही बुक करता येणार हॉटेल्स

नव्या व्यवसायात पेटीएम कंपनीनं तब्बल ५०० कोटी रुपये गुंतवले आहे

इ वॉलेट कंपनी पेटीएम अॅपवरून लवकरच ग्राहकांना हॉटेल्स बुक करता येणार आहे. ‘नाइट स्टे’ हे प्रसिद्ध हॉटेल बुकिंग अॅप पेटीएमनं विकत घेतलं आहे. आपल्या नव्या व्यवसायात पेटीएम कंपनीनं तब्बल ५०० कोटी रुपये गुंतवले आहे. ग्राहकांना अधिक तत्परतेनं हॉटेल बुकिंग करता यावं असा कंपनीचा मानस असणार आहे.

पहिल्या टप्प्यात जवळपास पाच हजारांहून अधिक लक्झरी आणि स्वस्त दरातील हॉटेल्सचं बुकिंग या अॅपद्वारे करता येणार आहे. नंतर हॉटेल्सचा आकडा वाढत जाणार आहे. बुकिंग साइट लाँच झाल्यानंतर काही काळात ५० हजार नवीन हॉटेल्स या अॅपद्वारे जोडली जातील अशी माहिती पेटीएमनं दिली आहे. ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार वेगवेगळे हॉटेल्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न पेटीएमचा असणार आहे.

२०२० पर्यंत आशियातील सर्वात मोठी हॉटेल्स बुकिंग साईट म्हणून पेटीएम ओळखलं जावं असा कंपनीचा मानस आहे. यासाठी कंपनीनं सरोवर, जूरी, ट्रीबो, इंडियो हॉटेल कंपनी जिंजर, स्टर्लिंग वीरिसॉर्ट्स सारख्या हॉटेल्स चेनशी भागीदारी केली असल्याचं समजत आहे.

First Published on January 30, 2019 5:36 pm

Web Title: now you can book hotels on paytm also