06 December 2019

News Flash

‘त्या’ दोन कुत्र्यांना सांभाळा आणि कमवा २९ लाख रुपये

या कुत्र्यांचं नाव मायलो आणि ऑस्कर असं आहे

कुत्रा हा असा प्राणी आहे जो त्याच्या लडिवाळ वागण्याने कोणालाही आपलं करुन घेईल. बोलता येत नसलं तरी आपल्या वागण्यातून आणि डोळ्यातून तो त्याच्या भावना व्यक्त करत असतो. त्याच्या याच निरागसतेमुळे आज असंख्य श्वानप्रेमी पाहायला मिळतात. अनेक जण या प्रेमापोटीच आपल्या घरामध्ये कुत्रा पाळतात आणि अगदी आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे त्याची काळजी घेतात. काही व्यक्ती अशा असतात की ते आपल्या कुत्र्यासाठी किंवा त्याच्या देखभालीसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. विशेष म्हणजे लंडनमधील एका जोडप्याने त्यांच्या दोन कुत्र्यांचा सांभाळण्यासाठी चक्क २९ लाख रुपयांच्या नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे.

लंडनमधील नाइट्सब्रिज येथे राहणाऱ्या एक जोडप्याने आपल्या दोन पाळीव कुत्र्यांचा सांभाळ करण्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे. हे जोडपं अनेक वेळा कामानिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या पाळीव कुत्र्यांना फारसा वेळ देता येत नाही. तसंच त्यांची काळजीही घेता येत नाही. त्यामुळेच या कुत्र्यांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी त्यांना एका व्यक्तीची गरज आहे. विशेष म्हणजे या कुत्र्यांची काळजी घेण्याच्या बदल्यात ते संबंधित व्यक्तीला २९ लाख रुपये पगार देण्यासदेखील तयार आहेत.

हे दोन्ही कुत्रे गोल्डन रिट्रीव्हर जातीचे असून त्यांचं नाव मायलो आणि ऑस्कर असं आहे. हे दोन्ही कुत्रे शांत स्वभावाचे आहेत. या कुत्र्यांच्या मालकाने Silver Swan Search या संकेतस्थळावर दोन्ही कुत्र्यांचा फोटो शेअर केला आहे. सोबतच त्यांना सांभाळणाऱ्या व्यक्तीला २९ लाख रुपये पगार देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही तर संबंधित व्यक्तीला या कुत्र्यांची कशी काळजी घ्यावी लागेल हेदेखील सांगितलं आहे. दरम्यान, या जोडप्याने काही अटीदेखील ठेवल्या आहेत. त्यांच्या अटीनुसार, संबंधित व्यक्तीला कुत्र्यांचा सांभाळ करण्याचा अनुभव असावा, त्याला जेवण तयार करता यावं, सोबतच तो अॅक्टीव्ह आणि विश्वासू असावा. विशेष म्हणजे या व्यक्तीला केवळ ५ दिवसच काम करावं लागणार आहे.

 

 

First Published on November 28, 2019 4:54 pm

Web Title: now you can get paid to look after two golden retrievers live in london townhouse ssj 93
Just Now!
X