03 August 2020

News Flash

नुसरत जहाँ यांनी इन्स्टाग्रामवर तो फोटो पोस्ट केला आणि…

नुसरत जहाँ यांनी एक फोटो पोस्ट केला आहे त्याची इंटरनेटवर बरीच चर्चा सुरु आहे.

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ या नेहमीच वेगवेगळया कारणांमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या नुसरत जहाँ यांनी एक फोटो पोस्ट केला आहे त्याची इंटरनेटवर बरीच चर्चा सुरु आहे. काही जणांनी त्यांना ट्रोल केले आहे तर काहींनी त्यांचे कौतुक केले आहे.

नुसरत जहाँ यांनी फुगे विकणाऱ्या एका लहान मुलासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोमधला मुलगा इतका गोड आहे की, त्यावरुन सोशल मीडियावर अनेकांनी वेगवेगळया प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुसरत जहाँ यांनी रस्त्याच्या कडेला फुगे विकणाऱ्या एका दीड वर्षाच्या मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे.

“फुगे विकणाऱ्या या दीड वर्षाच्या मुलाने माझा वीकएंड खास बनवला. हा मुलगा त्या फुग्यांच्या रंगापेक्षा सुंदर आणि गोड आहे” असे कॅप्शन नुसरत यांनी त्या फोटोला दिले आहे. अनेकांनी ह्दयाचे इमोजी टाकून त्या फोटोवर कमेंट केलं आहे. “गॉड ब्लेस यु, तुमच्या चेहऱ्याइतकंच तुमच ह्दयही सुंदर आहे” असे एका चाहत्याने संदेशामध्ये लिहीले आहे.

नुसरत जहाँ १९ जूनला कोलकतामधील व्यावसायिक निखिल जैनसोबत टर्कीमध्ये विवाहबद्ध झाल्या. तृणमुल काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आल्यापासून सतत त्या प्रकाशझोतात आहेत. इन्स्टाग्रामवर त्या पतीसोबतच फोटो नेहमी शेअर करत असतात. यावर्षी दुर्गा पूजा उत्सवात सहभागी झाल्याबद्दलही त्यांच्यावर टीका झाली होती. पण त्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्या. नुसरत यांनी लहान मुलासोबतचा फोटो शेअर केल्यानंतर काही तासातच हजारो कमेंट आणि लाईक्स आले. काहींनी त्यांचे कौतुक केले तर अनेकांनी ट्रोलही केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2019 6:17 pm

Web Title: nusrat jahan shares pictures with baby boy selling balloons dmp 82
Next Stories
1 आता नाही विसरणार कोणतंच काम, Whatsapp देईल आठवण
2 “किती कंजूस आहेस रे तू, संपूर्ण रात्र…;” संतापलेल्या चोराने घरमालकासाठी सोडली चिठ्ठी
3 पहाटे चार वाजता प्रियकाराच्या फिटबीटचे नोटीफिकेशन आलं अन् त्याचं पितळं उघडं पडलं
Just Now!
X